Home Social जेतवन बुध्द विहार मालेवाडा येथे प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महान यांची...

जेतवन बुध्द विहार मालेवाडा येथे प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महान यांची जयंती साजरी…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

    चिमूर तालुकातंर्गत जेतवन बुद्ध विहार,मालेवाडा येथे दि.5 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महान यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

     प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महान यांच्या प्रतिमेला बहिणाबाई बांबोडे,सत्यफुलाबाई चव्हाण,अशोक मेश्राम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.

            याप्रसंगी प्रदीप मेश्राम यांनी प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महान यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

        मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणारा,औषधी व इतर उपयुक्त वनस्पती,तसेच शिकारीस बंदी घालून,जंगलांचे संवर्धन करणारा,जगातला पहिला पर्यावरणवादी सम्राट.

     साम्राज्यात मनुष्याबरोबरच जनावरांसाठी ही चिकित्सालय,पाण्याची सोय करून प्राणीमात्रांचा ही प्रजेप्रमाणे सांभाळ करणारा सम्राट,हजार स्तुपांची निर्मिती करून,बुद्धांचा धम्म जगाच्या पाठीवर नेणारा सम्राट,लेणी, शिलालेख,स्तंभलेख याची भारताला सर्वप्रथम ओळख करून देणारा सम्राट अशोक.

     अशा शब्दात मान्यवरांनी प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महान यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.      

    याप्रसंगी भैय्याजी दहीवले,प्रफुल्ल वरखडे, विराज गजभिये,हृदय मेश्राम,गीताताई मेश्राम,शोभाताई चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप मेश्राम यांनी केले व आभार योगेश मेश्राम यांनी मानले.