Home शैक्षणिक गणित ऑलिम्पिऑड परीक्षेत नवजीवनचे यश…

गणित ऑलिम्पिऑड परीक्षेत नवजीवनचे यश…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) जमनापुर/साकोली येथे गणित ऑलिम्पिऑड परीक्षेचे पदक व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बक्षिस वितरणाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या भारती व्यास, प्रमुख उपस्थिती शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे व पर्यवेक्षिका वंदना घोड़ीचोर उपस्थित होते.

        विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिने नवजीवन सीबीएसई मध्ये प्राचार्या भारती व्यास यांच्या मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पिऑड परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. गणित ऑलिम्पिऑड परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या ३0 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकांचे वितरण करण्यात आले.

         या बक्षिस वितरण सोहळ्याप्रसंगी प्राचार्या, शाळा व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी व पर्यवेक्षिका यांनी पदक व प्रमाणपत्र वितरण करून सर्व विद्यार्थ्यांचा गौरव केला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, सचिव सौ. वृंदताई करंजेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय प्राचार्या, शाळा व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षिका व गणित शिक्षक विशाखा पशिने, मेघा संग्रामे, वैशाली राउत तसेच समस्त शिक्षकगण यांना दिले.

           सुवर्ण पदकाचे मानकरी ठरणारे विद्यार्थी दक्ष पर्वतकर, अर्णव काशीवर, आर्यन निपाणे, हर्ष पाटील, सारांश गुप्ता, सान्वी लिल्हारे, दक्षित हरिणखेडे, यक्षित बोपचे, स्माही पर्वते, स्वरा खंडाईत, अरहंत गणवीर, निधी येळे, वंशिका कुरंजेकर, अक्ष गुप्ता, मयंक मेश्राम, सौम्य बारसागडे, मेधांश सुरसाऊत, विहान टेंभुरकर, खुशी पंधरे, मानवी गुप्ता, शरयू काळे, कुशल रहेले, पांशुल मुनीश्वर, श्रेयस ढोके, शिवम करंजेकर, तीर्थ मोदी, युक्ती गहाणे, समीक्षा उईके, दीप्तेश काशिवार व हार्दिक अग्रवाल होते.

            कार्यकमाचे संचालन विशाखा पशिने तर आभार मेघा संग्रामे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नवजीवन मधील शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुमोलाचे योगदान दिले.