Home कृषी वाघोली पिक कापणी प्रयोगाचे पर्यवेक्षण जिल्हा कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांच्या प्रमुख...

वाघोली पिक कापणी प्रयोगाचे पर्यवेक्षण जिल्हा कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांच्या प्रमुख उपस्थितित करण्यात आली…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

  पारशिवनी:- रब्बी हंगाम २०२४ मध्ये महसूल मंडळाची गहू पिकाची उत्पादकता निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात येणा-या पिक कापणी प्रयोगाचे पर्यवेक्षण जिल्हा कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी मौजा वाघोली,ता.पारशिवनी, जि.नागपूर येथे दिनांक २५ मार्च २०२५ रोजी श्री.रंगराव काकडे यांचे शेतात केले.

        या प्रसंगी १०X१० मीटर प्लॉट मध्ये केलेल्या आयोजित केलेल्या पिक कापणी प्रयोगात गव्हाचे ११.२१ किलो उत्पादन आल्याचे दिसून आले. 

             या पर्यवेक्षणाचे वेळी पारशिवनी तालुका कृषि अधिकारी राकेश वसू,कन्हान मंडळ कृषि अधिकारी प्रभाकर शिरपुरकर,पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी रविंद्र उईके,वाघोलीचे ग्राम महसूल अधिकारी नागनाथ फड,कृषि पर्यवेक्षक एस.पी.कुबडे व जगदीश भालेराव,कृषी सहायक श्वेता अंबुज व साधना कांबळे,कोतवाल सेवक भोंडे आणि शेतकरी रंगराव काकडे उपस्थित होते.