Home Political संतोष गावडे यांची धानोरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड…

संतोष गावडे यांची धानोरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : खेड तालुक्यातील धानोरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संतोष मधुकर गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अनिल किसन गावडे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर हि निवडणूक झाली.

         सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यामध्ये संतोष गावडे यांची बिनविरोध निवड झाली. असल्याची माहिती ग्रामसेविका श्रीमती मेघा राऊत यांनी दिली. 

          निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी राजेंद्र वाघ यांनी काम पाहिले. ग्रामसेविका मेघा राऊत निवडणूक कामी सहकार्य केले. यावेळी उपसरपंच शांताबाई गावडे, सदस्य सारीका गावडे, ज्योती गावडे, अनिल गावडे, संग्राम गावडे,नवनाथ गायकवाड, सुरेखा गावडे तसेच धानोरे ग्रामस्थ उपस्थित होते.

         सरपंच संतोष गावडे म्हणाले की, गावाने माझ्यावर विश्वास ठेवून मला सरपंच पदाची संधी दिली आहे, त्या संधीचे सोनं करून गावाच्या विकासासाठी सातत्याने सर्वांना बरोबर व विश्वासात कार्यरत राहील. प्रामुख्याने महिलांचे प्रश्न, पाणी प्रश्न, रस्ते इत्यादी कामावर भर देईल.