Home Political भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी साधला इंदापूर शहरातील नागरिकांच्या समवेत संवाद…

भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी साधला इंदापूर शहरातील नागरिकांच्या समवेत संवाद…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          आज इंदापूर शहरातील सुप्रसिद्ध पकाचा चहा येथे राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सौभाग्यवती व जिजाऊ महिला फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री हर्षवर्धन पाटील व जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी अचानक भेट देत उपस्थितांसोबत संवाद साधला. 

           पाटील कुटुंबीय निवडणूक पुरतेच नव्हे तर सदैव जनसामान्यात, त्यांच्या सुख दुःखात सहभागी असतात. जनतेच्या कल्याणाकरिता वेगवेगळ्या माध्यमातून मदत केल्यामुळे या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

              ही निवडणूक ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लढत असल्यामुळे त्यांना कोणतीच अडचण येणार नाही असे अनेक जणांनी मत व्यक्त केले.