Home Political मतदारांच्या प्रचंड उपस्थितीत काँग्रेसचे पक्षाचे डॉ.सतीश वारजूकर उद्या उमेदवारी नामांकन अर्ज दाखल...

मतदारांच्या प्रचंड उपस्थितीत काँग्रेसचे पक्षाचे डॉ.सतीश वारजूकर उद्या उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करणार.. — चिमूर विधानसभा निवडणुक अधिकारी किशोर घाडगे उमेदवारांचे नामांकन अर्ज स्वीकारणार!

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

          वृत्त संपादीका 

          राष्ट्रीय काँग्रेस पक्षाद्वारे चिमूर विधानसभा मतदारसंघा करीता डॉ.सतीश वारजूकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.ते उद्या प्रचंड मतदारांच्या आशिर्वादाने आपला उमेदवारी अर्ज चिमूर विधानसभा मतदारसंघ निवडणुक निर्णय अधिकारी किशोर घाडगे यांच्याकडे दाखल करणार आहेत.

       उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार,खासदार डॉ.नामदेव किसान,माजी आमदार तथा खनिकर्म अध्यक्ष डॉ.अविनाश वारजूकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

           डॉ.सतीश वारजूकर यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळाल्याने पदाधिकाऱ्यांत,कार्यकर्त्यांत व मतदारात उत्साह आहे.

         तद्वतच त्यांच्या उमेदवारीमुळे बऱ्याच राजकीय खेळ्या अनुभवास येणार आहेत.