Home Maharashtra घर जावई न बनण्याच्या नादात केली आत्महत्या…  — तोयागोंधी येथील घटना…

घर जावई न बनण्याच्या नादात केली आत्महत्या…  — तोयागोंधी येथील घटना…

  कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी धानोरा 

 धानोरा तालुक्यातील तोयागोंधी येथील युवकाने ९ जून ला वीष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

        मृतक सुधाकर महारु पोटावी वय पंचवीस वर्ष असे युवकांचे नाव आहे. या युवकाने आपल्या शेतात दिनांक नऊ जून रोजी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली सुधाकर यांचे एका मुलीसोबत प्रेम होते लग्नासाठी मुलीकडून घरजवाई बनून यावे असा प्रस्ताव होता.

        त्यानुसार मुलाला घर जावई म्हणून सुरसुंडी गावाजवळ शिवटोला येथे घरजवाई म्हणून सुधाकरला नेऊन देणार होते परंतु त्या एक दिवस आधीच नव जून रोजी घर जावई बनवून राहणे हे त्याला पसंत नव्हते म्हणून एक दिवस आधीच त्यांनी आपल्या शेतात आपली जीवन यात्रा दिनांक ९ जून ला संपवली.

         मृतक सुधाकर हा नऊ जून रोजी दुपारला आपल्या शेतातून आंबे घेऊन आपल्या घरी आणून दिले व त्यानंतर दुपारला परत आपल्या शेतामध्ये निघून गेला सायंकाळी तोयागोंदी येथे पाऊस वादळ आल्याने सर्व लोक घरी आले सायंकाळ झाले.तरी मृतक सुधाकर हा अजून पर्यंत घरी आला नाही म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी म्हणून शेतामध्ये गेले असता त्याला घरच्यांना तो मृत अवस्थेत आढळून आला.

          त्याला ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांला मृत घोषित केले त्यानंतर आज सकाळी दिनांक 10 जून रोजी शव विच्छेदन करून मृतदेह घरच्यांच्या सोपावीला या घटनेचा पुढील तपास धानोरा पोलीस स्टेशन करीत आहे.