Home Maharashtra पोलीस बॉईज असोसिएशन प्रदेश संघटक पदी शाहेद सय्यद…..

पोलीस बॉईज असोसिएशन प्रदेश संघटक पदी शाहेद सय्यद…..

 प्रेम गावंडे

  उपसंपादक

दखल न्युज भारत

                पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आदेशानुसार यवतमाळ येथील रहिवासी असलेले शाहेद सय्यद यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

             शाहेद सय्यद यांनी या अगोदर पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष पद भूषविले आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय आणि पोलीस पाल्य यांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी बरीच आंदोलने केली. निवेदने दिली, मोर्चे काढले आहेत आणि त्यामुळे पोलीसांसाठी आजवर त्यांनी केलेली कामे पाहता संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी शाहेद सय्यद यांची महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.