बाबुलवाडा येथिल जि.प. शाळेत संत गाडगेबाबा यांच्या जयंती दिना निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

           पारशिवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बाबुलवाडा येथे आज शुक्रवार दि. 23 फरबरी 2024 रोजी सकाळी ठीक ११.३० वाजता संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

            जिल्हा परिषद शाळा बाबुलवाडा येथे संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेला शाळेचे मुख्य अध्यापक उमाकांत बागळकर , सहायक शिक्षिका सारिका ताई भोयर व शाळा व्यवस्थापन समिति ची अध्यक्षा ज्योती करकाडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

          या प्रसंगी मुख्य अध्यापक उमाकात बागळकर आणी सहायक शिक्षिका सारिकाताई भोयर यांनी “संत गाडगेबाबा यांचे ” जीवनावर प्रकाश टाकला.

             गाडगे महाराज हे अनिष्ट रुढी आणि परंपरेवर जोरदार प्रहार करत होते. किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यभर प्रबोधनाचे काम केले. गाडगे महाराज यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होता. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली.

             गाडगे महाराजांमध्ये गोरगरीब, दीनदलित ह्यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळ होती. लोकांमधील अंधश्रद्धा आणि गरीबी दूर करण्यासाठी शिक्षणाचे महत्व त्यांना माहित होते. प्रसंगी घरातील वस्तू विका पण आपल्या पाल्यांना शिकवा असे ते नेहमी सांगायचे.

            अशा शब्दात मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या जयती निमिताने त्याचे कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.

            या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती ची ज्योती करकाड़े , अर्चना बांगळकर , सुषमा करकाड़े , मनिषा नखाते , शिला अलोने , शंकुतला सोनबावने , अश्विनी वाघाडे तसेच व्यवस्थापन समिती चो पदाधिकारी पालक वर्ग ग्रामस्थ आणी विद्यार्थी प्रामुख्यान उपस्थित होते.

            अशा शब्दात मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.

           या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती ची ज्योती करकाड़े , अर्चना बांगळकर , सुषमा करकाड़े , मनिषा नखाते समिती चो पदाधिकारी पालक वर्ग ग्रामस्थ आणी विद्यार्थी प्रामुख्यान उपस्थित होते.