Home Social खापरी (धर्मु) येथे समता सैनिक दल शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन संपन्न.

खापरी (धर्मु) येथे समता सैनिक दल शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन संपन्न.

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी.

चिमूर:-

      चिमूर तालुक्यातील मौजा खापरी(धर्मु) येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून समता सैनिक दलाची शाखा उघडण्यात आली.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला,”समता सैनिक दल, च्या मध्यमातून शिल,शौर्य,बलिदान हा विचार समाजात रुजावा,असे प्रतिपादन दीक्षा भूमी नागपूर येथील समता सैनिक दल संघटक श्री.घनश्याम फुसे सर,मुख्य निमंत्रक सुनील शेंडे सर यांनी केले.

 

      त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन २५ ते ३० महिलांनी पुढाकार घेत समता सैनिक दल शाखेचाउद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

      कार्यक्रमाची सूर्वात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व मानवंदना देऊन झाली.

        समता सैनिक दल रॅली काढण्यात आली,रॅलीत राजमाता जिजाऊ,सावित्री बाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतीकृती वेशभूषा करून शुभारंभ करण्यात आला.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटक घनश्याम फुसे सर नागपूर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रक सुनील शेंडे सर नागपूर,समन्वयक राजरत्न कुंभारे सर नागपूर,महेश नंदेश्वर,धनमाला गोंधाने,प्राध्यापक अनिल भांगे सर,शीला रंगारी,भारतीय बौद्ध महासभेचे नारायण कांबळे सर चिमूर,जितेंद्र घोडेस्वार नागपूर उपस्थित होते.

      मान्यवरांचे हस्ते,”समता सैनिक दल,नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.शीलवान सैनिकांमध्ये देश बदलविण्याची ताकत असते असे विचार अध्यक्ष फूसे यांनी व्यक्त केले.

      सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनमाला गोंधने,सूत्रसंचालन प्रकाश मेश्राम तर आभार सुमन मेश्राम यांनी मानले.

         कार्यक्रम यशस्वी करिता उपासक-उपसीका यांनी श्रम घेतले.नामफलक उध्दघाटक प्रसंगी कार्यक्रमात मोठ्या संख्येने सर्व बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.