कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी.
पारशिवनी:- तालुक्यातील काद्री अंतर्गत सुखदेव कालोनी वार्ड न. ४ येथील दुचाकी रात्रोच्या वेळेस चोरीला गेली असल्याची घटना घडली.
चोरी गेलेली दुचाकी घरापुढील अंगणात लॉक लाऊन ठेवली होती.सरद मोटार सायकलचा क्रमांक एम.एच.४०, व्हि.२१९४ असा आहे.
बाईक मालक नितेंद धाबुलाल कुंभारे यांनी त्यांच्या दुचाकी गाडीचा शोध घेतला परंतू गाडी दिसून आली नाही.यामुळे त्यांनी पोलिस स्टेशन पारशिवनी येथे तक्रार दाखल केली.

तक्रारी नुसार भांदवी कलम ३७९ नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर दुचाकीची किंमत २५ हजार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
पोलिस निरिक्षक सार्थक नेहते यांचे मार्गदर्शनात पो. हवा.अज्ञात आरोपीचा पुढील तपासातंर्गत शोध घेत आहेत.


