Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार ….. ...

ब्रेकिंग न्यूज… — अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार ….. — सावली -बोथली मार्गावरील घटना.. — वळनदार मार्ग देत आहे अपघाताला आमंत्रण..

    सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

     अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.विक्की अजय कोंकावार(२६) असे मृतकाचे नाव असून तो बोथली येथील रहिवासी आहे.

           नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे,या कामात तरुण वर्ग सजगपणे लागला आहे.सर्वत्र नव्या वर्षाच्या आगमनासाठी अनेक ठिकाणी तरुणाची मेजवानी सुरु आहे.या साठी निश्चित जागांची शोधाशोध सुरू असताना,अचानक सावली -बोथली मार्गावर एका तरुणाचा दुर्दैवी मुत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

     घटनेच्या दिवशी मृतक हा एम.एच. 34,सी.सी. 2165 होंडा स्पेलेंडर या दुचाकीने कामानिमित्य आपल्या स्वगाव बोथली वरुन सावली कडे येत असताना सावली वरून बोथली कडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाची जोरदार धडक झाली,त्यात रक्तबंबाळ अवस्थेत मृतक हा सावली -बोथली मार्गावरील वळणावर पडला होता.तर अज्ञात वाहनधारक घटनास्थळावरून पसार झाले आहेत.

        घटनेची माहीती होताच पोलीस कर्मचारी धावुन आले आणि पंचनामा करून मृतकाचे शव उत्तरीय तपासणी साठी ताब्यात घेतले.

         विशेष म्हणजे नुकताच अपघात झालेले ठिकाण हा वळणादार मार्ग असून आतापर्यंत या ठिकाणी अनेक जनांना आपला जीव गमवावा लागला आहे,तर कित्येक जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे.

            नववर्षाच्या पुर्वसंध्येवर कुटुंबातील कर्तबगार तरुणाचा मुत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुख:चे डोंगर कोसळले आहे.मृतकाच्या पश्चात आई वडील, बहीण असा आप्त परीवार आहे.पुढील तपास सुरु आहे …..