राजकीय नेते आणि चित्रपटसृष्टीच्या नट,नट्या या चारित्र्यहीनांचा कधीच आदर्श घेऊन बरबाद होऊ नका.यांनीच आपले आणि देशाचे वाटोळे केले.( एखादा अपवाद वगळून)…
आज आम्ही ( आम्ही भारताचे लोक) आमच्या देशातील सर्वच पक्षातील सर्वच राजकीय नेते ( चालू शतकात निर्माण झालेले ), त्याचप्रमाणे सर्वच चित्रपटसृष्टीतील नायक नायिकांनी,आणि जगात दरिद्री ( गरीब ) देशच क्रिकेट खेळतात. यामध्ये अमेरिका, रशिया,फ्रांस,जपान,चीन,इस्रायल,यांच्या क्रिकेट टीम सुद्धा नाहीत.यामध्ये केवळ इंग्लंड एकच सर्वात जुना देश आहे.जो क्रिकेट खेळत आलेला आहे पण आजपर्यंत त्यांनी कधीही विश्व्कप जिंकलेला नाही.
थोडक्यात सांगावयाचे असे की,जगात साधारण लहान मोठे 500 च्या जवळपास देश आहेत. त्यातील केवळ 20 च्या आतच क्रिकेट खेळतात.जे सर्वात जास्त कर्जबाजारी अर्थात गरीब किंवा दरिद्री आहेत.या देशातील जनता नेहमीच भुकेकंगाल असते.महागाईने,बेरोजगारीने नेहमीच त्रस्त असते.आमच्या देशाची परिस्थिती सुद्धा यापेक्षा वेगळी नाही.
आज चालू शतकाच्या सुरुवातीपासून आमच्या देशातील परिस्थिती राजकीय नेते,चित्रपटातील नट आणि नट्या आणि इतर क्षेत्रातील सेलिब्रेटी या सर्वांच्या चारित्र्यहीन,अनितीच्या भ्रष्टाचाराने,गुंडगिरीने,अज्ञानी असमंजस निरापराध सर्वसामान्य जनतेसमोर वरील सर्वच जबाबदार मंडळींनी,महापुरुषांचा आदर्श कधी पोहचूच दिला नाही!
त्या महापुरुष आणि तत्ववेत्त्यांना वरील जबाबदार मंडळींनी RSS च्या षडयंत्राचा वापर करून महापुरुष आणि तत्ववेत्त्यांनी संघर्षमय जीवनातून निर्माण केलेली वैचारिक क्रांती…
वरील जबाबदार मंडळीनी त्या त्या महापुरुष आणि तत्ववेत्त्यांच्या पुतळ्यात आणि स्मारकात कायमची गाडून टाकली….
आणि सर्वसामान्य जनतेला केवळ पुष्पहार अर्पण करून डोकं आपटायला भाग पाडलं!
अशी वरील वरील आमची जबाबदार मंडळी या शतकात देशाला आणि आम्हाला सर्व बाजूने लुटायला निघाली.आणि आम्ही भरडले जात आहोत.हे वास्तव आहे!
आज आमची संसद आणि विधानमंडळे गुंडाच्या टोळ्यांचे कारखाने निर्माण झाले आहेत. ज्यातून बाहेरच्या गुंडाच्या टोळ्यांना अभय मिळते. तसेच न्यायालयातील ” त्या ” खुर्चीत बसलेला व्यक्ती सुद्धा अनिती आणि भ्रष्टाचाराने हात बरबटल्यामुळे ( न्यायाधीशाच्या घरातील नोटांच्या बंडलांना आग लागली होती ) तो न्याय न देता केवळ निकाल देऊन मोकळा होतो.
आमदार,खासदार व मंत्रिपदे तर यांच्यासाठी जीव की प्राण कोणत्याही मार्गाने,येन केन प्रकारे ते मिळविणे एवढीच जिद्द आणि धडपड.या पदाना जबाबदारी म्हणून या चालू शतकात कुणीही आजपर्यंत स्वीकारलेली नाही.
तिथे जाण्याच्या अगोदर संविधाननिष्ठतेची शपथ घेतात. आणि तिथे जाऊन आई वडिलांचे संस्कार, महापुरुषांचे विचार, सामाजिक भान, स्वतःवरची जबाबदारी, त्याला कर्तव्यातून सिद्ध करणे. या सर्व बाबी तो बाजूला ठेऊन अज्ञानी लोकांवर कसा वचक बसवून मी राज्य कसा करेल यातच तो प्रगती करतो आणि देशाला, आम्हाला सर्वांगाने लुटण्यास मोकळा होतो. हेमा मालिनी, सचिन तेंडुलकर ( बाळ गंगाधर टिळक म्हणतात,की शेतकऱ्यांनी लोकसभेत नांगर हाकायचा का?…
मग इथे एका सचिन तेंडुलकरकडून संसदेत छक्के मारायचे होते का?,अमिताभ बच्चन,राजेश खन्ना,गोविंदा,जया बच्चन,रामदास आठवले ( राज्यसभेतील कवितेतील वगातला नाच्या) यांच्यासोबतच इतर सर्वच राजकारणी मंडळी देशातील प्रत्येक नगरसेवकापासून ते मोदी/ शहापर्यंत एकालाही….
लोकशाही आणि संविधानिक ” स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ” या मूल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी….
जगाचे पहिले शहीद झालेले सॉक्रेटीस ( ग्रीक तत्वज्ञ) यांचे साधे नाव सुद्धा ठाऊक नसेल!..
अशी आमच्या देशातील लोकशाहीची आणि जनतेची वाईट अवस्था वरील जबाबदार मंडळींनी करून ठेवली.आणि येथील स्वतःला प्राध्यापक, डॉक्टर ( पी. एच. डी. धारक समजणारा ) लेखक,साहित्यिक,पत्रकारिता या सर्वांनी ढेरीवरून हात फिरवत केवळ टाळ्या वाजवीण्याचेच काम करण्यात 75 वर्षे घालवली म्हणून आमच्या देशाने RSS कुसांस्कृतिक गुलामीकडे वेगाने घोडदौड चालू केली आहे.
आणि हे जर सर्व जे चाललेलं आहे.या प्रवाहाचा यु टर्न घ्यायचा असेल,75 वर्षांपूर्वी गुलामीकडून स्वातंत्र्याकडे निघालेल्या रथाने 2014 पासून जो RSS ने यु टर्न घेऊन देशाला गुलामीत घेऊन जाण्याचा पहिला गियर टाकला.आता तोच गियर पुन्हा युटर्न घेऊन टॉप गियर जर टाकायचा असेल तर…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान यातूनच,संविधान जागृती देशाची प्रगती हाच एकमेव उपाय आहे..
अन्य कोणताही पर्याय नाही,तेंव्हा वरील शीर्षकातिल आवाहनाला सुद्धा जागृतीतून जपणे हे सुद्धा आवश्यक आहे…
आवाहनकर्ता…
अनंत केरबाजी भवरे संविधान विश्लेषक, रेणापूरकर,औरंगाबाद, 7875452689…



