पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी, सुवरधारा व सालई येथे शिवसेना (उबाठा) ग्रामसंवाद बैठक संपन्न…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

  पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी, सुवरधारा व सालई (माहुली) येथे उद्या गुरुवार दिनांक 30.05.2024 रोजी सायंकाळी रामटेक विधानसभा, मौजा सुवर्णधारा, मौजा नवेगाव खैरी, मौजा सलाई कोळीमारा जिल्हा परिषद क्षेत्रा अंतर्गत पारशिवनी तहसील येथे श्री विशाल बरबटे (रामटेक विधानसभा उबाठा) यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

  यावेळी श्री कैलास खंडार (पारशिवनी, तालुका प्रमुख), श्री लोकेश बावनकर (जिल्हा प्रमुख, युवासेना), श्री प्रशांत लक्कडकर (करंभड सर्कल विभाग प्रमुख), श्री किशोर चौधरी (माहुली विभाग प्रमुख), श्री जितेंद्र जांबे, श्री संजय जांबे, श्री. देसाई, श्री.अश्विन कुसुंबे, श्री.निखिल राऊत,श्री.प्रफुल्ल वासनिक,श्री.पंकज प्रजापती,हर्षल सावरकर,कुणाल कापसे आदी मान्यवर उपस्थित होते व ग्रामस्थ व उपस्थित नागरिक व स्थानिक नागरिकांसह कार्यकर्त्यांशी चर्चा केली.