राणी लक्ष्मीबाई विद्यालय पारशिवनी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

        पारशिवनी दिनांक ३०/५/२०२४ रोजी सकाळी पारशिवनी येथील विद्या शिक्षण प्रसारक मंडळ ॲकडमी ऑफ हायर एज्युकेशन नागपूर द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई विद्यालय पारशिवनी विद्यालयाचा एस एस सी परीक्षेचा निकाल ९६.८७ टक्के लागलेला आहे.

           प्रावीण्य प्राप्त व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आज दिनांक ३० मे २४ ला पालक संचालक कोमलचंदजी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

         या प्रसंगी पुरुषोत्तम धोटे माजी सरपंच बळवाइक  मुख्याध्यापक विजय साबळे गोपाल कडू जेष्ठ पत्रकार सह विद्यार्थ्यी व पालकांच्या उपस्थित संपन्न झालेल्या गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव करून पुष्प गुच्छ व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

           राणी लक्ष्मीबाई विद्यालय पारशिवनी विद्यालयातून एस एस सी परीक्षेत ३२ विद्यार्थ्यी बसून पैकी ३१ विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले.प्रथम श्रेणीत १ कु.प्राजली अर्जुन‌ भुसारी ८२.४० टक्के.प्रथम श्रेणीत १६ विद्यार्थ्यी दृतिय श्रेणीत १० विद्यार्थ्यी व पास श्रेणीत ४ विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहे.

        संस्था अध्यक्ष रणजित बांबू देशमुख उपाध्यक्ष डॉ आशिष देशमुख संस्थापक डॉ भाऊसाहेब भोंगे यांनी अभिनंदन केले आहे.

शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.