स्व.खा.बाळूभाऊ धानोरकरांचे राजकिय गुरु खासदार विनायक राऊत अंतिम दर्शनाला राहणार उपस्थित..

उमेश कांबळे ता प्र भद्रावती :

         चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे विद्यमान काॅंग्रेस पक्ष खासदार तथा शिवसेनेचे पूर्वाश्रमीचे माजी आमदार बाळूभाऊ धानोरकर यांचे काल (दि. ३०) ला पहाटे २ च्या सुमारास दिल्लीत निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (दि. ३१) ला अंतिम संस्कार होणार आहेत.

      या अंतिम संस्काराला खासदार बाळूभाऊ धानोरकरांचे राजकिय गुरु शिवसेना नेते खासदार श्री.विनायक राऊत व माजी विधानपरिषद सदस्य दुष्यंतजी चतुर्वेदी तथा पूर्व विदर्भ शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे अन्य पदाधिकारी वरोरा येथे सकाळी ११.०० वाजता

उपस्थित राहणार आहेत.

         खासदार बाळूभाऊ धानोरकर हे शिवसेनेत होते त्यावेळेस पासून शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांचेसह त्यांचे घनिष्ठ ऋणानुबंध होते.

          खा.बाळूभाऊ धानोरकर यांची जळणघळण ही प्रामुख्याने शिवसेनेतूनच झाली.या घटनेचे त्यांना अतीव दुःख झाले आहे. अशा कठीण प्रसंगी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेवून पक्षातर्फे श्रध्दांजली अर्पण करण्याकरीता व त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी शिवसेना नेते विनायक राऊत उपास्थित राहणार आहेत.

         खा.राऊत यांचे सकाळी मुंबईवरुन विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ नागपुर येथे ८.३० वाजता आगमन होईल व तिथून सकाळी १०.३० वाजेपर्यंत वरोरा येथे उपस्थित असतील,अशी माहिती शिवसेना वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी दिली आहे.