जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी
दखल न्यूज भारत
चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघाचे व महाराष्ट्र राज्याचे एकमेव खासदार स्वर्गीय सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.
त्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आज दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी शिर्डी विमानतळ येथून नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील.
नागपूर विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर ते हेलिकॉप्टरने चंद्रपूर मोरवा विमानतळ येथे दाखल होतील. त्यानंतर पाच वाजून पन्नास वाजता मोरवा विमानतळ येथून मोटारीने वरोरा येथे जाणार आहेत.
त्यानंतर संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी खासदार सुरेश धानोरकर यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. यावेळी ते त्यांच्या कुटुंबीयांची आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांची सांत्वनपर भेट घेतील.
या भेटीनंतर ते रात्री मोटारीने नागपूर येथे रवाना होणार आहेत,अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयातून देण्यात आली आहे.