ब्रेकिंग न्यूज… — ट्रक-मोटारसायकल अपघातात दुचाकी चालक ठार…

     राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

          कुरखेडा वडसा राष्ट्रीय महामार्गावरील नान्ही हद्दीतील एच पी पेट्रोल पंप समोरील घटना असुन मृतक दुचाकी चालकाची ओळख पटली नव्हती.

            सालई खुर्द येथील दुपारी ११•३० वाजे दरम्यान दिपक ट्रान्सपोर्ट नागपूर येथील ट्रक क्रं.MH-31CB-8635 वडसा वरुन कुरखेडा येथे ट्रान्सपोर्ट सामान खाली करण्या करीता येत असताना नान्ही गावा लगतच्या राष्ट्रीय महामार्गावरील एच पी पेट्रोल पंप समोर ट्रक -मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात मोटारसायकल क्र.MH-33-Z-6124(हीरो-सीडी डिलक्स) मोटारसायकलस्वार व्यक्तीचा जागेवरच मागील चाकात आल्यामुळे मृत्यू झाला.

             अपघात होताच ट्रक चालक घटना स्थळावरुन भिती पोटी फरार झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस विभागाला माहिती होताच त्वरित घटनास्थळी येऊन परीस्थिती आटोक्यात आणली.