जे एस पी एम महाविद्यालयाचे डंबाजी हर्षे यांचा सेवानिवृत्त पर सत्कार… 

 भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधि 

            जे एस पी एम महाविद्यालय धानोरा येथील डंबाजी हर्षे हे शिपाई या पदावर 34 वर्ष सलग सेवा केली. वयोमानुसार ते आज दिनांक 31 जानेवारी 2024 ला सेवानिवृत्त झाले.

             त्या प्रसंगी कार्यक्रमचे अध्यक्ष महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. पंकज चौहान तर सेवानिवृत्त कर्मचारी डंबाजी हर्षे शशिकला हर्षे प्रा.डॉ.गणेश चुदरी प्रा.डॉ.हरिष लांजेवार प्रा.  डॉ.विना जंबेवार प्रा. डॉ.संजय मुरकुटे उपस्थित होते.

           डांबाजी हर्षे यांनी 34 वर्ष सलग सेवा केली ते आज वयोमानानुसार 31 जानेवारी 2024 ला सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांचा शाल व श्रीफळ भेट वस्तू देऊन त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे संपूर्ण प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.