मुरुमगाव येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळावा संपन्न.

प्रा.भाविकदास करमनकर

    तालुका प्रतिनिधी धानोरा 

           धानोरा तालुक्यातील,मुरुमगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केन्द्र शाळेच्या पटांगणात आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळावा चे आयोजन करण्यात आले होते.

        या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून तालूका अध्यक्ष भाजपा सौ.लताताई पूगांटे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार राहुल पाटील तहसील कार्यालय धानोरा हे होते. 

        प्रमुख पाहूणे म्हणून अजमन राऊत माजी सभापती पचांयत समिती धानोरा,सरपंच शिवप्रसाद गवरना ग्रामपंचायत मुरुमगाव,वैद्यकीय अधिकारी डॉ.राहूल बनसोड प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव,गटशिक्षण अधिकारी आरेवली धानोरा,सरपंच वासुदेव उसेंडी ग्रामपंचायत येरकड,सरपंच शेवंता हलामी ग्रामपंचायत पन्नेमारा,सरपंच मोनिका पूडो ग्रामपंचायत सावरगाव,उपसरपंच प्रकाश हलामी ग्रामपंचायत पन्नेमारा,नायब तहसीलदार आम्रपाली लोखंडे तहसील कार्यालय धानोरा,तालूका कृषी अधिकारी एन.एच.बाबर धानोरा,व्हॉइस ऑफ मीडिया धानोरा तालुका अध्यक्ष मो.शरीफ कूरेशी,ग्रामीण पत्रकार ओम देशमुख मुरुमगाव,मूनिर शेख मुरुमगाव,बैसाकूराम कोटपरिया मुरुमगाव,सदस्य अभिजीत मेश्राम ग्रामपंचायत मुरुमगाव,सदस्य राजेंद्र कोठवार ग्रामपंचायत मुरुमगाव,सदस्य क्रिषणाबाई भक्ता ग्रामपंचायत मुरुमगाव,सदस्य चारूलता मार्गीया ग्रामपंचायत सदस्य मुरुमगाव,रोहीदास मार्गीया खेडेगाव,तलाठी लाडवे मुरुमगाव,तलाठी मेश्राम सावरगाव,तलाठी साई कोडाप कोसमी,मंडल अधिकारी प्रमोद धाईत मुरुमगाव हे होते.

           मुरुमगाव,कोसमी,सावरगाव, व पन्नेमारा येथील संपूर्ण सरकारी,कोतवाल वर्ग, व अगंणवाडी सेविका व आशा वर्कर,मुरुमगाव परिसरातील हजारो महिलांनी कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित दर्शवली होती.

        या कार्यक्रमात जि.प.उच्च प्राथमिक केन्द्र शाळा मुरुमगाव व स्व. रामचंद्र दखने विद्यालय मुरुमगाव येथील विद्यार्थी वर्गाने सांस्कृतिक रंगारंग काय॔क्रम आयोजित केला होता.

        मौजा पन्नेमारा येथील चार अपंग लाभार्थींना सायकलचे वाटप करण्यात आले.तसेच उमेद तर्फे बचतगटातील महिलांना धनादेश देण्यात आले आणि उमेद मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सौ.अर्चना देशमुख,चारूलता मार्गीया,जोगेश्वरी ताराम, व ईतर महिलांचा सत्कार करण्यात आला.

          तहसील कार्यालय थानोरा तर्फे महिलांना जॉब कार्ड,संजय गांधी निराधार, रेशनकार्ड,वाटप करण्यात आले.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव तर्फे विस महिला लाभार्थीना गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले.

          100 महिलांचे गोल्डन कार्ड बनवून देण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी डॉ.राहूल बनसोड प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव यांनी महिलांना गोल्डन कार्ड व आरोग्य सुविधा बाबत परिपूर्ण मार्गदर्शन केले.

         या काय॔क्रमात प्रशासकीय प्रत्येक विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते.सदर काय॔क्रमाच्या प्रारंभी मडंळ अधिकारी प्रमोद धाईत यांनी मार्गदर्शन केले.बि.जे.चिंचोळकर सर यांनी स्वागत गीत सादर केले.

          डॉ.राहूल बनसोड,अजमन राऊत,सौ.लताताई पूगांटे,सेवंता हलामी,तहसीलदार राहुल पाटील यांनी उपस्थित हजारो महिलांना सशक्तीकरण बद्दल व शासकीय योजनेंतर्गत माहिती दिली.

       महिलांनी बळकट व आत्मनिर्भर कसे राहावे आणि महिलांच्या अधिकारा बद्दल संपूर्ण माहिती दिली.

           याचबरोबर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळाव्यामध्ये प्रामुख्याने हजारो महिला उपस्थिती राहिल्या बद्दल भाजपा तालूका अध्यक्ष व माजी जि.प.सदस्य सौ.लताताई पूगांटे,तहसीलदार राहुल पाटील तहसील कार्यालय धानोरा यांनी महिलांचे अभिनंदन केले.

         या कार्यक्रमाचे संचालन साई कोडाप यांनी केले तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार देवेंद्र वाळके यांनी केले.