मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यावर भद्रावती पोलिसांची होणार दंडात्मक कारवाई… — नवं वर्षाचे पर्वावर मद्य प्राशक युवक वर्गाना भद्रावती पोलिसांचे आवाहन… 

     उमेश कांबळे

तालुका  प्रतीनिधी भद्रावती 

             नवीन वर्षाच्या शुभ पर्वावर तरुण युवक वर्गाना नवीन वर्ष साजरा करण्याचा उत्साह अति जोमात असतो आणि तो उत्साह मद्य प्राशन केल्याशिवाय साजरा होणारच नाही अशी त्यांची विचारधारा असते मात्र मद्य प्रश्न करून वाहन चालविणारे हे युवक वर्ग अपघाताला बळी पडून आपला जीव गमावून बसतात. हे मात्र तितकेच खरे. त्यासाठी नवीन वर्षाच्या शुभ पर्वावर तरुण युवक वर्गाना मद्य प्राशन करून वाहन चालविणे हे महागात पडणार असून त्यांचेवर भद्रावती पोलिसांची दंडात्मक कारवाई होणार असून त्यांना मद्य प्राशन करून वाहन चालवू नये अन्यथा सक्तीची कारवाई करण्यात येईल असे आव्हान भद्रावती पोलिसामार्फत करण्यात आले आहे. 

            दि- ३१ डिसेम्बरला वर्ष समाप्ती चे दरम्यान ड्रंक अँड ड्राईव्ह ची सक्तीची मोहीम हि संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार यावर आळा घालण्याकरिता भद्रावती पोलिसांनी तरुण युवक वर्गाना बेधुंदपणे सैराट दुचाकी चालविणे, कर्कश हॉर्न वाजविणे, टपरीवर रस्त्यावर आडवी उभी दुचाकी लावू नये आणि मद्य प्राशन करून वाहन चालवू नये,असे आवाहन करण्यात आले आहे. वाहन चालविताना मद्य प्रश्न करून अपघातास बळी पडू नये , सर्वानी वाहतूक नियमाचे काटेकोरपणे पालन करा असे निर्देश भद्रावती पोलिसांनी दिले आहे.