धानोरा शहरात जशन ए ईद मिलाद नबी च्या निमित्याने जुलूस मोहम्मदी साजरा…  

    भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

          धानोरा येथील सुन्नी जामा मस्जिद यांच्यावतीने 28 /9/2023 ला रोज गुरुवारला सकाळीच नऊ वाजता सुनी जामा मस्जिद पासून धानोरा शहराच्या प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने धानोरा येथील मुस्लिम बांधवांनी जुलूस चे मोठ्या उत्साहात आयोजन केले होते.

         त्यासाठी शहरात तोरण झेंडे बॅनर्स धानोरा शहर संपूर्ण सजावटीने लखलखित करण्यात आले होते.या कार्यक्रमात घोषणांनी शहर दुमदुमून गेलेले होते. धानोरा शहराच्या मध्यभागी नाद आणि पठण संभाषण सारे भाई भाई चे नारे देऊन हिंदू मुस्लिम चे एकता बघण्यासारखी होती.हा जुलूस शांततेत धानोरा शहरातून काढण्यात आलेला होता.

       तसेच लहान मुलांचे कार्यक्रम घेण्यात आले होते या कार्यक्रमाला धानोरा शहरातील सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुबारक अली सय्यद हाजी मुस्ताक कुरेशी इरफान बबलू पठाण हारुण पठाण सलीम पठाण शब्बीर शेख शकील पठाण माजी अध्यक्ष समीर कुरेशी नदीम शेख नवेद शेख शारीक शेख अस्लम कुरेशी अकबर शेख जागीर शेख मेहमूद पठाण अन्वर पठाण गफार शेख जमीर कुरेशी समीर पठाण कासम शेख अजित कुरेशी बबलू पठाण इरफान शेख सरफराज शेख जमीर शेख जमील शेख हमीद शेख रहीम शेख वसीम सय्यद महबूब पठाण बशीर शेख अब्दुल्ला भाई शफी शेख साहिल शेख अलीम शेख इम्रान अन्सारी अन्वर पठाण सद्दाम शेख बाबू शादाबखान असलम शेख इमरान कुरेशी फैजन पठाण आफाफ शेख जुनेद आरहाणं आखीफ कोणेंन फैज शादाब रियाज शेख आसिफ शेख हापीज समीर रजा हाॅफिस मेहराज हापिस महफूस या सर्वांनी मार्गदर्शन केले तसेच फळ वाटप करण्यात आले.तसेच धानोरा शहरात महाप्रसादाचा वितरण करण्यात आले.याप्रसंगी धानोरा शहरातील सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.