सत्यवान रामटेकेंचे कुटुंबासहीत आमरण उपोषण… — आमरण उपोषणाचा ६ वा दिवस.. — कळ येईल का? — रिपाईचा पाठींबा…

ऋषी सहारे

संपादक

       देसाईगंज : वडसा सामाजिक वनिकरण विभागा अर्तगत झालेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणातील वडसा- कुरखेडा वनविभागात झालेल्या भष्ट्राचाराची चौकशी करण्यासाठी सत्यवान रामटेके हे आपल्या कुटूंबासह आमरण उपोषणाला बसले आहेत.

         यापूर्वी वडसा सामाजिक वनिकरण समोर त्यांनी दोनदा आमरण उपोषण करूनही कारवाई केली नाही. त्यामुळे आता सामाजीक वनीकरण गडचिरोली समोर सत्यवान रामटेके हे आपल्या कुंटूंबासह आमरण उपोषणाला बसले आहेत. 

        आजचा सहावा दिवस असुन येत्या दोन दिवसात कारवाई झाली नाही तर येत्या दोन दिवसात कुटुंबासहीत आमरण उपोषणाला बसण्याचा ईशारा सत्यवान रामटेके यांनी दिलेला आहे.

         सदर उपोषणाला रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी पांठिबा दिल्ला असून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषण स्थळाला भेट देवून प्रकरणाबाबत सविस्तर चर्चा केली.

           सदर प्रकरणाची योग्य चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. 

        उपोषण मंडपात आई अहिल्या रामटेके,पत्नी रिता सत्यवान रामटेके व मुलगी तिसिता सत्यवान रामटेके सर्व कोढाळा हे बसले आहेत.

           प्रंचड प्रमाणात भ्रष्टाचार करूनही दोषीवर कारवाई न करता दोषीना पाठीसी घालण्याचा प्रयत्न सुरु आहे.दोषीवर कारवाई केल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही असा पवित्राही सत्यराम रामटेके यांनी घेतला आहे.

      मात्र,संबंधित विभागाला चौकशी करण्याबाबत कळ येत नसल्याने भष्ट्राचाराचे पाणी कुठेतरी मुरत असल्याची शंका गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना आता येवू लागली आहे.