वाघजाई माता मित्र मंडळाने मिरवणूक आणि गाजावाजा न करता १०० हेल्मेटचे वाटप…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक 

पुणे विभागीय 

आळंदी : येथील वाघजाई माता मित्र मंडळाने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी राबविला सामाजिक उपक्रम, विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 100 दुचाकीस्वारांना मंडळाच्या वतीने हेल्मेट वाटप

        विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 100 दुचाकीस्वारांना मंडळाच्या वतीने हेल्मेट वाटप करण्यात आले. दिघी आळंदी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांच्या हस्ते या हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

         फक्त मिरवणूक आणि गाजावाजा न करता आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आणि रस्ते अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे होतात. त्यातही ज्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नाहीत, अशांच्या मृत्यूचे प्रमाणत सर्वाधिक आहे. हेल्मेट घातले असते, तर जीव वाचला असता, अशा प्रकारचे निष्कर्ष अनेक अपघाताच्या तपासात समोर येतात. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. याबाबत आळंदी येथील वाघजाई माता मित्र मंडळाने स्तुत्य उपक्रम राबवला आहे. दिघी आळंदी वाहतूक विभागाचे अधिकारी, अंमलदार आणि वाघजाई माता मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देहूफाटा चौकामध्ये हेल्मेट वापरण्याबाबत फलक दाखवून जनजागृती. 100 दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

           वाघजाई माता मित्र मंडळाने लोक वर्गणीतून गणपती उत्सव साजरा केला. या वर्गणीमधून शिल्लक राहिलेल्या पैशातून 100 हेल्मेट विकत घेऊन त्याचे वाटप केले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

         यावेळी मंडळाचे पदाधिकारी आशिष सुरेंद्र तापकीर, पंकज पवार, अक्षय तापकीर, ओम सोनवणे, हेमंत तापकीर, चंदू तापकीर, अजिंक्य साळुंखे, गणेश कदम, करण तापकीर, घनश्याम चौधरी, रोहन पवार, सार्थक जगताप, अविनाश मुळे, धनंजय जाधव, चिन्मय पाठक, कार्तिक थोरवे, यश खैरे, चैतन्य हरिश्चंद्रे,उमेश मुंडे, वेदांत खैरे, सुदर्शन घुगे, विकीराज दळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.