भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
दिनांक 29/08/2025 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथे हेल्पिंग हॅण्ड बहुउद्देशीय संस्था धानोरा, यांच्या तर्फे करियर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरजुसे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पठाण सर व मार्गदर्शक म्हणून शुभम देशपांडे सर व संस्थेचे अध्यक्ष सौ.पायल मशाखेत्री व संस्थेचे सचिव आशिष मशाखेत्री उपस्थित होते.
तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था धानोरा चे निर्देशक शुभम देशपांडे सर यांनी उपस्थितीत इयत्ता 11 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेज मध्ये सुरू असलेल्या स्क्रील रूट अंतर्गत व्यवसाय अभ्यासक्रमाचा विद्यार्थांना पुढील कौशल्यशील शिक्षणाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष सौ.पायल मशाखेत्री यांनी याबद्दल माहिती दिली तसेच संस्थेचे सचिव आशिष मशाखेत्री यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबद्दल विस्तृत अशी माहिती दिली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुरजुसे सर, बुरमवार सर, पठाण सर, दरडे मॅडम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



