Home Maharashtra दर्यापूर शहरातील न.प.कन्या शाळेचे मैदान बनले डम्पिंग ग्राउंड, मैदानात अस्वच्छता मातीचे ढिगारे…...

दर्यापूर शहरातील न.प.कन्या शाळेचे मैदान बनले डम्पिंग ग्राउंड, मैदानात अस्वच्छता मातीचे ढिगारे… — परिसरातील व्यावसायिकांनी केली मैदानाची ऐशी-तैशी… — नगरपरिषद प्रशासनाचे कमालीचे होतेय दुर्लक्ष… 

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक 

      दर्यापूर शहराच्या केंद्रस्थानी नगरपालिकेचे मोठे मैदान असून या मैदानावर अनेक खेळाडू घडले गेले आहे. सदर मैदानाची इतिहास दप्तरी नोंद सुद्धा आहे. दर्यापूर शहरातील कानाकोपऱ्यातील मुले खेळण्यासाठी या मैदानावरती येत असतात. क्रिकेट, हॉलीबॉल, फुटबॉल यासह परिसरातील वयोवृद्ध नागरिक हे व्यायाम करण्यासाठी शतपावली करण्यासाठी कुटुंबासमवेत उपस्थित असतात.

        परंतु प्रशासनास मिळणाऱ्या मोबादल्यासाठी हे मैदान कुणाच्याही ताब्यात देण्यात येत असते. या अगोदर सुद्धा हे मैदान विविध व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. त्यांनी सुद्धा मैदानाची ऐशी तैशी केली होती. 

            मागील महिन्याभरापासून व्यावसायिकांना नगरपरिषद प्रशासनाने मैदान उपलब्ध करून दिले होते. दरम्यान ते व्यावसायिक त्यांचा कालावधी संपल्यानंतर संपूर्ण मैदानावरती अस्वच्छतेचा धिंगाणा पसरवून निघून गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने मैदानात सराव करणारे खेळाडू मोबाईल मध्ये गुंतलेले दिसत आहेत. मैदानाचा एक दोन एकराचा परिसर हा पूर्णपणे अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला गेला आहे.

         पालिका प्रशासनाचे शहराच्या विकास कामावर पूर्णतः दुर्लक्ष असून आता हा ज्वलंत प्रश्न उपस्थित झाला आहे. परिसरातील फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते किरकोळ स्वरूपाचे व्यावसायिक व परिसरातील नागरिक हे आपला कचरा थेट मैदानाच्या आवारात टाकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तसेच नागरिक सदर मैदानावर लघुशंका करतात‌. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून महिला वर्गांना सुद्धा फिरण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

         संबंधित नगरपरिषद प्रशासनाने मैदानाच्या सफाई व स्वच्छते कडे अधिक लक्ष देण्याची गरज बनली आहे त्यासोबतच लोकप्रतिनिधींनी सुद्धा ह्या अति गंभीर समस्येवर लंक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.