वर्तमानकालीन असो की भूतकालीन परिस्थिती म्हणजे अवस्था.भविष्यकालीन अवस्था काय असेल ते वर्तमानकाळ ठरवीत असतो.
परिस्थिती म्हणजेच अवस्था,अवस्थेचे मूळ व्यवस्था होय.कारण जशी व्यवस्था तशी अवस्था असते.उदा.विषमतेची व्यवस्था असेल तर अवस्था ( परिस्थिती ) पण विषमच असणार.आणि समतेची व्यवस्था असेल तर परिस्थिती म्हणजे अवस्था पण समतेचीच असेल.म्हणजेच व्यवस्थेचे कारण किंवा मूळ ही व्यवस्था आहे.आणि व्यवस्थेचा परिणाम म्हणजेच व्यवस्था होय.परिणाम आणि कारण हे एकमेकाशी निगडीत असतात.परिणाम म्हणजे अवस्था आणि त्याचे कारण व्यवस्था होय.म्हणजेच कारण ( मूळ ) शिवाय परिणाम नाही,आणि परिणामाशिवाय कारण नाही.हेच सूत्र आपण विस्ताराने पाहू या.
भूतकालीन असो की वर्तमान कालीन व्यवस्था ही विषमतावादी होती आणि आहे.म्हणजेच आर्थिक व्यवस्था ही दारिद्र्य,गरीबी,मध्यम,श्रीमंत ,गर्भश्रीमंत अशी आहे.याचा अर्थ ही व्यवस्था वर्गीय आहे,देशाची म्हणजेच देशातील समाजाची परिस्थिती म्हणजेच व्यवस्था ही वर्गीय आहे,म्हणजेच आर्थिक विषमतेची व्यवस्था आहे.
देशात सामाजिक वर्गीकरण पण आहे,म्हणजेच येथील ब्राम्हण हे स्वतःला सर्वात उच्च समजतात,आणि बाकीच्यांना कनिष्ठ आणि निच समजतात.याच प्रमाणे या देशात 6500 जाती यांची उतरंड आहे,म्हणजेच वरची जात आणि खालची जात अशी मानसिकता आहे,म्हणूनच बेटीबंदी आहे,म्हणजेच आंतरजातीय विवाहास कायद्याची संमती असूनही प्रत्यक्षात मात्र ही विषमतेची व्यवस्था आहे.सारी माणसे ही माणसेच आहेत,सारखीच आहेत,त्यात उच्च नीच भेदभाव नाही ,ही समतेची मानसिकताच नाही,म्हणजेच येथे सामाजिक विषमता आहे.
सामाजिक विषमतेनुसार या देशात राजकीय व्यवस्था आहे,म्हणजेच ज्या जातींची संख्या जास्त त्याच जातीचे आमदार खासदार जी. प . प . स .मेंबर निवडून येतात आणि सत्ता हाती घेतात.याचा अर्थ सत्ता ही जातीच्या आणि धर्माच्या हातात आहे.याचा अर्थ इथे राजकीय विषमता आहे.म्हणजेच सत्तेत समान न्याय नाही.म्हणूनच सामाजिक न्यायासाठी जातीय आरक्षण हा उपाय शोधला , पण यामुळे जाती धर्म अजून घट्ट होताना दिसतात.याचे कारण जातीची आणि धर्माची पक्कड ( मानसिकता ) गेली नाही.म्हणजेच ही मानसिक विषमता जो पर्यंत जात नाही,तो पर्यंत ही सामाजिक विषमता जाणार नाही,सामाजिक समतेची मानसिकता निर्माण करणे जरुरीचे आहे,या विषमता निर्मूलनामुळे सामाजिक समता येईल,आंतरजातीय विवाह होतील,यातून जाती धर्माचे डोक्यावर बसलेले भूत भानामती नाहीशी होऊन सामाजिक समतेची व्यवस्था प्रस्थापित होईल,हे काम सोपे आहे,पण यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी आहे,ती निर्माण करायची असेल तर ज्यांच्या डोक्यातून जात आणि धर्म गेला,अशीच माणसे राजकारणात निवडून दिली पाहिजेत.गेली पाहिजेत.
असेच आर्थिक विषमतेचे पण आहे.आर्थिक वर्गीकरण ज्यांना मान्य नाही,अशीच माणसे राजकारणात हवे.म्हणजेच आर्थिक समता किंवा समानता,म्हणजेच समाजवादी नेते सत्तेत असले पाहिजेत तरच आर्थिक वर्गीकरणाची अवस्था संपुष्टात येईल ,म्हणजेच आर्थिक सामाजिक राजकीय विषमतेची व्यवस्था नष्ट होऊन समतेची व्यवस्था निर्माण होईल,या व्यवस्थेतील अवस्था ,परिस्थिती पण समान समतेवर चालेल.यामुळे गुन्हेगारी नष्ट होईल,हिंसा नष्ट होईल. आणि शांतता सुव्यवस्था नांदेल.
यासाठी विषमतेचे दुष्परिणाम आणि समतेचे सुपरिणाम प्रत्येक मतदारास माहीत करून देणे हे समतावादी कार्यकर्त्यांचे,साहित्यिक,कलाकार,विचारवंत, राजकीय ,धार्मिक,सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार यांची जबाबदारी आहे,कर्तव्य आहे,ते निभावणे जरुरी आहे,नुसते समतेचे विचार घेऊन उपयोगाचे नाही,तर ते विचार आपण इतरांना पटविण्याची मोहीम हाती घेण्याची ही काळाची गरज आहे.हे नाही झाले तर समतावादी पण गुलाम म्हणूनच येत्या काही काळात राहणार आहेत.
गुलामी हटाउन राजकीय स्वातंत्र्य मिळविले.मतदानाचा हक्क मिळविला,आता लोकशाही जाऊन जाती धर्माच्या रस्त्याने जर इथे हुकुमशाही आली तर आपण सर्वच एका हुकूमशहाचे गुलामच बनून राहणार आहोत.म्हणून ही गुलामीची मानसिकता घालविली पाहिजे,तरच समतेची व्यवस्था निर्माण होईल,समतेच्या व्यवस्थेतूनच समतेची अवस्था ,परिस्थिती निर्माण होईल,यासाठी व्यवस्था परिवर्तनाची लढाई करणे महत्वाचे आहे.



