थकबाकीदारांनी कराची रक्कम भरून संभाव्य कार्यवाही टाळावी.. — पारशिवनी नगरपंचायतला सहकार्य करावे..

      कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी::-नगरपंचायत पारशिवनी हद्दीतील मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणावर मालमत्ता धारकांकडे थकबाकी आहे.संबंधित मालमत्ता धारकांनी थकीत कर भरना त्वरित भरण्याचे आवाहन नगरपंचायत पारशिवनीचे प्रशासक मुख्याधिकारी अर्चना भिवगडे व्दारा करण्यात आले आहे. 

            थकीत कर भरना न केल्यास संबंधित मालमत्ता धारकावर रीतसर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतचे प्रशासक मुख्याधिकारी अर्चना भिवगडे यांनी दिली. 

         पारशिवनी नगरपंचायतच्या वतीने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी प्रशासक मुख्याधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली विशेष वसुली मोहीम सूरू करण्यात आली आहे.

          पारशिवनी नगरपंचायतीचे प्रशासक मुख्याधिकारी यांचे द्वारा संबंधित विभागिय अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकांची कर वसुली साठी नेमणूक करण्यात आली आहे. जे थकबाकीदार मालमत्ता व पाणीपट्टी भरणा करणार नाही अशा थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीकरणे,नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रा प्रसिद्ध करणे या सह कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे.

         नागरिकांनी कर भरण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील नगरपंचायतचे सर्व वसुली विभाग सूरू राहणार आहेत. तरी थकबाकीदारांनी कराची रक्कम भरून होणारे संभाव्य कार्यवाही टाळावी व नगरपंचायत सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक मुख्याधिकारी अर्चना भिवगडे यांनी केले.