शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील मौजा मोटेगाव येथील आबादी खाली जागेवर एअरटेल कंपनी टॉवरचे अनाधिकृत बांधकाम सुरू आहे.ते बांधकाम त्वरीत थांबवण्याची मागणी चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
बांधकामासाठी मधूकर राजेश्वर सुकारे यांनी ग्रामपंचायत मध्ये दिनांक १ जानेवारीला अर्ज सादर केला होता.परंतू जागेबाबत कोणताही पुरावा दिला नाही व टॉवर बांधकामाची मंजुरी घेतली नाही.
ज्या ठिकाणी बांधकाम होत आहे,ती आबादीची जागा असून राजेश्वर सुकारे यांच्या मालकी हक्कांची नाही.
सदर व्यक्तीने ग्रामपंचायत मध्ये अर्ज करत असताना सातबारा व नकाशा अर्जासोबत जोडलेला पहिजे होते.परंतू जागे संबंधातील दस्तावेज जोडले नाही.
नियमाप्रमाणे आबादी प्लॉट मध्ये मध्ये ३ वर्षा पासून घर बांधले नाही तर जागा शासनकडे जमा करावी लागते.तरी सुद्धा आबादी प्लॉटच्या खाली जागेवर टॉवरची परमिशन कशी काय? असा प्रश्न संजय सोणवाणे यांनी शासन-प्रशासनाला केला आहे.
एअरटेल कंपनी सर्व नियम धाब्यावर बसवून टाॅवरचे बांधकाम करीत आहे.यामुळे आर्थिक व्यवहाराचा संसय बळावला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय सोनवाने व गावकऱ्यांनी केला आहे.
याबाबत ताबडतोब चौकशी व शहानिशा करुण सदर बेकायदा टॉवरचे बांधकाम बंद करून,कंपनीवर कारवाई व दंड वसूल करावा आणि अतिक्रमणं जागा मुक्त करण्यात यावी अशी मागणी संजय सोनवाने यांच्या नेतृत्वाखाली गावातील लोकांच्या सह्यानिशी चिमूर तहसीलदार,संवर्ग विकास अधिकारी चिमूर व संरपच ग्रामपचायत मोटेगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया….
एअरटेल टॉवरचे कामासाठी राजेश्वर सुकारे यांनी ग्रामपंचायतमध्ये अर्ज केला.परंतू त्यांना कोणत्याही प्रकारची बांधकामांची मंजूरी दिली नाही.टॉवरचे काम मालकी हक्कात होत आहे तर मोजमाप करून सातबारा नकाशा जोडावे,अन्यथा कारवाई करून दंड वसूल करण्यात येईल.



