भामोद येथे विवाहीत महीलेची आत्महत्या.. — माहेर कडील मंडळीचा घातपाताचा आरोप..

युवराज डोंगरे-खल्लार 

       उपसंपादक 

           एका विवाहीत महीलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भामोद येथे शुक्रवार (दि.२९) रोजी दुपारी उघडकीस आली आहे.   

               रेशमा प्रेमदास रायबोले ( तायडे ) वय.33 रा.भामोद,ता. असे मृतक महिलेचे नाव आहे. घटनेच्यावेळी कुटुंबातील काही सदस्य घरात खाली असतांना पत्नी रेशमा हिने वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन आत्महत्या केली असे पती प्रेमदास रायबोले यांनी सांगितले. 

         मृतक विवाहितेच्या आईने लग्न झाल्यापासूनच पतीकडून मुलीचा छळ होत होता.रेशमा हिने आत्महत्या केली नसुन घातापात झाल्याचा आरोप माध्यंमाशी बोलतांना व्यक्त केला.दरम्यान शवविच्छेदनावेळी उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. 

        यावेळी उपस्थित माहेर व सासरच्या मंडळीत शाब्दिक वाद झाल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यामुळे येवदा व दर्यापूर पोलीसांनी समजूत घालत वाद निवडला. 

           मृतक महिलेच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,पती असा आप्त परीवार आहे.मृतक महीलेच्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रांरीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून,शवविच्छेदन रिपोर्ट अहवालावरुन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहीती ठाणेदार आशिष चेचरे यांनी दिली.

***

बाँक्स 

मृतक रेशमाचा व्हिडीओ व्हायरल..

        भामोद घटनेतील रेशमा रायबोले या मृतक महीलेस पती प्रेमदास रायबोले याकडून सतत मारहाण व घराबाहेर काढून देत होते.माझ्या जीवीतास काही झाल्यास पती सासू-सासरे व नणंद जबाबदार राहील असा २०२१ मधील जुना व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याने येवदा पोलीस नेमकी कोणती ठोस कारवाई करणार याकडे जनमाणसांचे लक्ष लागून आहे.