“अंगणवाडी सेविकांनी,बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर आयुक्तांच्या पत्राची केली होळी.. — व्यक्त केला निषेध…

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

 पारशिवनी :-. विविध मागण्यांसाठी पारशिवनी येथील महिला बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी गेल्या 30 दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

         दरम्यान,अंगणवाडी महिला सेविकांनी पारशिवनी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर मुंबई आयुक्तांनी दिलेले पत्र सादर केले,त्यात त्यांनी आंदोलन करणार्‍या महिला कर्मचाऱ्यांकडून अंगणवाडीच्या चाव्या घेऊन आशा वर्कर्स,महिला बचत गट,सीआरपी,ग्रामपंचायत कर्मचारी,शिक्षकांनी पंचनामा करावा.अशाप्रकारे आयुक्तांनी दिलेल्या पत्राचा अंगनवाडी सेविका व मदवनिस यांनी जाळून तीव्र निषेध व्यक्त केला.

          महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने हे आंदोलन सुरू केले आहे.मानधन वाढ,मासिक पेन्शन,ग्रॅच्युइटी यासह प्रलंबित मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून संप सुरू झाला आहे. 

          मंत्रालय आणि हिवाळी अधिवेशनावरही मोर्चा काढण्यात आला.मात्र,अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.महाराष्ट्र राज्य मुंबई एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त,रुबल अग्रवाल यांनी 22 डिसेंबर 2023 रोजी एक पत्रक जारी केले.  

         ग्रामपंचायतीच्या वतीने महिला बचत गट,आशा वर्कर्स व सुशिक्षित विद्यार्थिनींच्या मदतीने पोषण आहाराचे वाटप करण्याचे सांगण्यात आले. 

         याचा निषेध करत महिला कार्यकर्त्यांनी हे पत्रक जाळले. याशिवाय आयुक्तांच्या आयात संघटनेने पारशिवनी निषेध व्यक्त केला.  

          आयटकच्या जिल्हाध्यक्षा सुनीता मानकर,पारशिवनी आंगणवाडी संघटनेच्या अध्यक्षा उषा सहारे सचिव माया कठारे,इंदू नागपुरे माला खोब्रागडे,चंदा गजभिये,राधिका चव्हाण,कविता श्रीवास,कल्पना नाकाडे,शिल्पा बड़वाईक,गिता भड यांच्यासह एकूण 200 हून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.