लाखनी विदर्भ कोकण बँकेत संविधान दिन साजरा…

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी

लाखनी:- भारतीय संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे. भारतीय संविधान हे चार खांबावर उभारलेले असून डॉ आंबेडकरांनी संविधान व लोकशाहीला व्यक्तिमहात्म्य तसेच जात धर्माचा धोका असल्याचे प्रतिपादित केले होते तो धोका आजही कायम आहे असे प्रतिपादन ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा लाखनीच्या वतीने आयोजित संविधान दिन कार्यक्रमात व्यक्त केले.संविधान निर्मितीबद्दल समयोचित विस्तृत माहिती प्रा.डॉ सुरेश खोब्रागडे, ऍड. प्रशांत गणवीर, लाखनी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर अमोल तांबे, सचिन उके,पवन खांडेकर,विठ्ठल मस्के इत्यादींनी विविध मार्मिक व माहितीपूर्ण उदाहरणासहित दिली.

             विदर्भ कोकण ग्रामीण बँक क्षेत्रीय कार्यालय भंडारा अंतर्गत येणाऱ्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या वतीने घेण्यात आलेला हा कार्यक्रम विदर्भ कोकण ग्रामीण बैंकचे क्षेत्रीय प्रबंधक पी. जी. धकाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला कार्यक्रमाला डॉ. सुरेश खोब्रागडे जेष्ठ्य साहित्यिक , ग्रीनफ्रेंडस नेचर क्लबचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर प्रा. अशोक गायधने, लाखनी पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस निरिक्षक अमोल तांबे, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री सोनवाने, श्री सचिन जी उके, श्री तोशिष हर्षे , सचिव प्रगती एनजीओ, विदर्भ कोकण ग्रामीण बैंकचे क्षेत्रीय कार्यालयाचे वा.र. खरे, ॲड. श्री.प्रशांत गणवीर, श्री पवन खांडेकर, श्री पंकज खांडेकर, श्री तेजेश गिरेपुंजे, श्री.मोहन बोंदरे, डॉक्टर दीपक इलमकर, जेष्ठ्य पत्रकार श्री भोंगाडे, श्री विठ्ठल मस्के , श्री सूर्यकांत गभने , श्री.नासिक बागडे उपाध्यक्ष वैशाली बौद्ध महासंघ, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, श्री जयपाल वनवे, समीर नंदेश्वर, व्ही. जी. कापगते,भुषण जांभुळकर, राजेश तितीरमारे, प्रसन्न उके, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

          कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक लाखनी शाखेचे प्रबंधक डी. ए. खंडेरा यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री जयपाल वनवे सर यांनी मानले.

         कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता बँकेचे अधिकारी उप मिस स्वाती जयदे, ऑफिस असिस्टंट श्री. मनोज आडे, श्रीमती माधवी भुरले श्री. सूरज वाघाडे, BC श्री व्हि. एस. रिनाईत , शामसुंदर रहांगडाले, रविकांत मांढरे, दुली गिरेपुंजे,सतिश शहारे, बबनराव मस्के यांच्यासह परिसरातील जागृत नागरिकांनी सहकार्य केले.