Home Social गेली अनेक वर्षांपासून गार अकोले आणि कोंढार भागाने आमच्या कुटुंबावर दिलेला विश्वासाचा...

गेली अनेक वर्षांपासून गार अकोले आणि कोंढार भागाने आमच्या कुटुंबावर दिलेला विश्वासाचा विसर पडू देणार नाही,:- विजयसिंह मोहिते पाटील…. — ओम उद्योग समूहाचे मालक रणजीत (भैया) मित्र परिवार यांच्या सहकार्याने दिवाळी निमित्त स्नेहभोज कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती…

 बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी..

       गार अकोले,तालुका माढा येथील स्वामी समर्थ महाराजांच्या पावनभूमी मध्ये रणजीत (भैया) केचे मित्र परिवाराच्या वतीने दिवाळी निमित्त स्नेह भोजनाचे आयोजन केले होते.

         या स्नेहभोजन कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,माढा तालुक्याचे विद्यमानआमदार अभिजीत पाटील,माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील,संचालक गोविंदभाऊ पवार सह सर्वच प्रमुखांची उपस्थिती होती .

     आमदार अभिजीत पाटील स्नेहभोजन प्रसंगी बोलताना म्हणाले की,मोहिते पाटलांचा आशीर्वाद व आपल्या सर्वांनी मतदान रुपी दिलेली साथ असल्यामुळेच मी विधानसभेत आमदार म्हणून मला जाता आले. 

        याबद्दल कधीही मतदारांचा विसर पडू देणार नाही.तसेच अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांसाठी मदत मिळेपर्यंत आमचे नेहमीच प्रयत्न राहातील. 

          रनजीत भैया केचे हा एक तरुण कार्यकर्ता असून यांनी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे चांगलीच कार्यक्रमाला शोभा आली,असे आमदार अभिजीत पाटील यांनी स्नेहभोजन प्रसंगी उद्गार काढले,, 

         दीपावली पाडव्याचे औचित्य साधून, रणजीत (भैया) केचे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली गारअकोले येथील मंगल कार्यालय ठिकाणी स्नेहभोजन समारंभासाठी 2 हजाराहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. 

        या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,आमदार अभिजीत पाटील,माळशिरस पंचायत समिती सभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील,संचालक गोविंदभाऊ पवार उपस्थित होते.

         गार अकोले येथील एक तरुण कार्यकर्ता व नावा रूपाला येणारा युवा उद्योजक रनजीत भैया केचे यांची,जिद्द,व चिकाटी,माणुसकी,आणि प्रेम,या सर्वच गोष्टी एकत्र आल्या म्हणूनच विजयसिंह मोहिते पाटील व विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असतो.

       रणजीत भैया केचे परिवाराच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, व विद्यमान आमदार अभिजीत पाटील,माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा शाल,श्रीफळ,हार देऊन सन्मान करण्यात आला.

         कार्यक्रमासाठी आलेले कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा देखील रणजीत भैया केचे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तसेच कार्यक्रमा प्रसंगी आमदार अभिजीत पाटील,संचालक गोविंदभाऊ पवार यांनी आपले विचार मांडले.

      कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन संचालक गोविंदभाऊ पवार यांनी केले,तर शेवटी स्नेह भोजना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

चौकट…

     गार अकोले आणि कोंढार भागाचे सहकार महर्षी पासूनचे ऋणानुबंध तिसऱ्या पिढीपासून चालत आहे. 

     उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना भेटल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळत राहते.गार अकोले आणि कोंढार भागासाठी त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे असे गौरवोद्गार संचालक गोविंदभाऊ पवार यांनी प्रस्ताविक प्रसंगी काढले.