बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांचे आणि परिसराचे पंचनामे तातडीने आणि सरसकट करून ठेवा शासन मदत देण्यात तत्पर आहे गरजूंच्या आणि बाधितांच्या मदतीसाठी शासन सज्ज आहे. औषधोपचार, वीज, पिण्याचे पाणी, खाण्यासाठी अन्न याची सुविधा मुबलक प्रमाणात करा आणि पंचनामे सरसकट करा अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी मोहोळ तालुक्यात पाहणी दौऱ्याच्या वेळी दिल्या.
सीना नदीच्या मोहोळ तालुक्यातील काठावरील गावांम ध्ये पुराचा जबरदस्त तडाखा बसला आहे. यातील पासलेवाडी बोपले परिसर आणि नांदगाव ची पाहणी केल्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मामा बोलत होते.
यावेळी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, मोहोळचे आ.राजू खरे, माढ्याचे आ.अभिजीत पाटील, तहसीलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे कृषी अधिकारी आणि अन्य सरकारी कर्मचारी उपस्थित होते.
मी मंत्री असलो तरी मी शेतकरी पुत्र आहे खचू नका घाबरू नका, सरकार तुमच्या पाठीशी ठाम आहे असेही आवाहन कृषिमंत्री भरणे यांनी केले. त्यावेळी त्यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून बाधितांना धीर दिला त्याचबरोबर फूड पॅकेटचे वितरण केले.
राज्याचे कृषीमंत्री दत्ता मामा भरणे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या प्रयत्नाने MIT पुणे येथील विद्यार्थी प्रमुख शुभम तापडिया यांच्या सह 15 जण यांनी दहा लाख रुपयांचे कीट तयार करून आणले असून त्याचे वाटप सुरू केले आहे.
सीना नदीच्या पात्रात विसर्ग वाढवल्यामुळे पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला असून आपापली काळजी घेण्याचे आणि संकट समयी मदत कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन मोहाळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी केले.



