Home Social नेरी तंमुसच्या अध्यक्ष पदी पिंटु खाटीक…

नेरी तंमुसच्या अध्यक्ष पदी पिंटु खाटीक…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी… 

      चिमूर तालुकांर्गत मौजा नेरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पिंटु खाटीक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

           नेरी येथील ग्रामपंचायतीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात तहकूब झालेली ग्रामसभा आज दिनांक २९ आगष्ट रोजी घेण्यात आली.आज झालेल्या तहकूब ग्रामसभेत सर्वानुमते पिंटू खाटीक यांची तमुसे अध्यक्षपदी निवड करण्यात आली.ग्रामसभेत गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

              सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेखाताई पिसे होत्या,तर सभेला ग्रामपंचायत उपसरपंच चंद्रभान कामडी, ग्रामअधिकारी राजेश कांबळे, सदस्या संगीता कामडी, संगीता वैरागडे, पद्मश्री नागदेवते,पिंटु खाटीक उपस्थित होते.

         पिंटु खाटीक यांची तंटा मुक्त समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आल्याने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक स्वागत करण्यात आले.

          पिंटु खाटीक यांच्या निवडीबद्दल माजी तंमुस अध्यक्ष हरीदास चांदेकर, उपसरपंच चंद्रभान कामडी,नानाजी दडमल,शंकर दडमल,माणिक नगराळे, हरिश्चंद्र बांगडे,संजय नागदेवते पत्रकार, मिलिंद जांभुळकर, रुस्तम पठाण,दयाराम पिसे,हर्षल खुशाल कामडी,दयाराम पिसे, रामचंद्र कामडी,विनोद चौधरी आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.