लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयाचा एस एस सी परीक्षेचा निकाल 100 टक्के….

  बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

           पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयाच्या दहावी परीक्षा मार्च 2024 शाळेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे.

            विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा सुभद्राबाई महादेव बोडके, माजी सरपंच श्रीकांत बोडके, माजी ग्रामपंचायत सदस्य समाधान बोडके, विद्यालयाचे मुख्याध्यापक कोरटकर सर व सर्व शिक्षक वर्ग आणि इतर संचालक पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

         एसएससी बोर्ड परीक्षेत प्रथम व द्वितीय, त्रीतीय क्रमांकाचे तीन विद्यार्थी यशाचे प्रथम मानकरी ठरले.

1)चौगुले विश्वजित मोहन 89.80

2)कु.मुडके श्रेया सचिन 88.00

3)कु.जगताप अंकिता विजय 87.80

          यशस्वी विध्यार्थ्यांचे शाळेच्या व संस्थेच्या आणि शिक्षक शिक्षकेतर व मुख्याध्यापक यांच्या वतीने अभिनंदन केले.