ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, दि.२९ : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिंक छळापासून संरक्षण अधिनियम २०१३ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक खाजगी आस्थापना जिथे १० किंवा १० पेक्षा अधिक कर्मचारी (महिला व पुरुष मिळून) कार्यरत आहेत.
अश्या प्रत्येक खाजगी आस्थापना, कंपनी, एम.आय.डी.सी., मॉल, शैक्षणिक संस्था, दुकाने, बँक, अशासकीय संस्था, ट्रस्ट, सोसायटी, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री, करमणुक, क्रीडासंकुले, प्रेक्षागृहे, आरोग्य सेवा देणारे इत्यादी यांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.
तसेच याबाबतची माहिती ही SHE BOX PORTAL वर नोंदविणे आवश्यक आहे. करीता सदरील माहिती नोंदविण्याकरीता https://shebox.wcd.gov.in या वेबसाईटवर जाऊन होम स्क्रीनवर Private Head office Registration या टॅब वर क्लिक करुन आवश्यक त्या सर्व माहितीचा तपशील भरुन Submit या टॅब वर क्लिक करुन अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदविता येईल.
अधिनियमातील कलम २६ मध्ये जर एखादया मालकाने अ) अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही ब) अधिनियमातील कलम १३, १४, २२ नुसार कार्यवाही केली नाही. क) या कायद्यातील व नियमातील विविध तरतूदींचे व जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यास मालकाला ५० हजार रुपये दंड होईल तसेच हाच प्रकार पुन्हा घडल्यास आस्थापनेचा परवाना रद्द, दुप्पट दंड अशी तरतूद आहे.
करिता सर्व खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करुन त्याबाबतची माहिती SHE BOX PORTAL वर भरण्याबाबतचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बॅरेक क्रं.१, कॉम्पलेक्स, गडचिरोली करीत आहे. याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास दुरध्वनी क्र. ०११-२३३८८०७४ किंवा ई-मेल techsupport_shebox@gov.in येथे संपर्क करावा असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.


