पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १०१५ मतदारा पैकी ९७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क… — ९५.५६ टक्के झाले मतदान.. — आज होणार मतमोजणी.

 

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी :-

पारशिवनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काल झालेल्या निवडणुकी अंतर्गत १०१५ मतदारा पैकी ९७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

      काॅग्रेस आणि भाजपा मध्ये सरळ टक्कर झाली असून काॅग्रेस पक्षाचे व शेतकरी सहकार पॅनलचे चार उमेदवार अगोदरच अविरोध निवडून आले आहेत.

       त्यामुळे दोन्ही पॅनलचे १४/१४=असे २८ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने काल झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मधुन ११ व ग्रामपंचायत गट ३ उमेदवार निवडून देण्यासाठी सेवा सहकारी संस्था मध्ये ५५९ पैकी ५३० मतदारांनी मतदान केले,म्हणजे ९४.८१% टक्के मतदान झाले. तर ग्रामपंचायत गटातिल मतदारसंघात ४५६ मतदारा पैकी ४४० मतदारांनी मतदान केले म्हणजे ९६.४९% टक्के मतदारानी मतदान झाले.

      या निवडणुकीचा निकाल आज सकाळी संत तुकाराम सभागृहात तकिया मारोती देवस्थान येथे मतमोजणी केंद्रावर जाहीर करण्यात येणार आहे. 

      या निवडणुकीत काँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी माजी मंत्री सुनील बाबू केदार व राजेंद्रजी मुळक व चंद्रपालजी चौकसे यांच्या कुशल मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष दयाराम भोयर,अशोकराव चिखले,उमराव निबोंने,श्रीधरजी झाडे महासचिव,इदपाल गोरले,दिपक वर्मा,शिवहरी भड उपाध्यक्ष नरेंद्र जिनिंग,दिपक भोयर,डुमनजी चकोले अध्यक्ष पारशिवनी काग्रेस कमेटी,सभापती सौ. मंगलाताई उमराव निंबोने सभापती पंचायत समिती पारशिवनी,उपसभापती करूणाताई भोवते,माजी उपसभापती चेतन देशमुख,सौ. अर्चनाताई भोयर जिल्हा परिषद सदस्या,राजुभाऊ कुसुंबे शिक्षण सभापतीसह अनेक कार्यकर्ते यांनी निवडणूकीत सत्ता काबीज करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

        भाजप + शिदे गटासाठी यांनी चंद्रशेखर बावनकुळे व आमदार अॅड आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार केला. कार्यकर्ते सुधाकर मेघर, प्रकाश वांढे,राजेश कडू माजी सभापती पंचायत समिती पारशिवनी,अशोक कुथे,फजीत सहारे,डॉ.प्रमोद भड,राहुल नाखलेसह अनेकांनी परिश्रम घेतले.

        या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आपली सत्ता स्थापन करण्यासाठी आजी माजी आमदार व जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,ग्राम पंचायत सरपंच- सदस्य व ईतर कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

       त्या परिश्रमाचे फलित मतमोजणी अंती जाहीर करण्यात येणाऱ्या निकालानंतर कळेल. मात्र या निवडणुकीत पुन्हा एकदा सुनिल केदार , राजेन्द्र मुळक,चन्दपाल चौकसे गटाची एक हाती सत्ता राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे.