निमलगुडम जि.प शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न… — पहिलीत दाखल विद्यार्थ्यांचा स्वागत…

रमेश बामनकर

अहेरी:- राजाराम खां. केंद्रांतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमलगुडम येथे आज दिनांक २८ एप्रिल रोजी शाळापूर्व तयारी मेळावा पार पडला.

मेळाव्याचे उदघाटक आनंदराव कोडापे तर अध्यक्ष नागेश शिरलावार, प्रमुख पाहुणे ग्राप सदस्य जयश्री आत्राम, शाळा समितीचे अध्यक्ष रमेश बामनकर,उपाध्यक्ष अशोक कोडापे, सामाजिक कार्यकर्ते राकेश सोयाम,राकेश बामनकर होते.

     या प्रसंगी पहिल्या वर्गात दाखल केलेल्या पाच विध्यार्थ्यांचा स्वागत करून बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आले. तसेच शाळेचे समस्यावर विचार मंथन करण्यात आले या वेळी मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक के. एम. कोंडागुर्ले तर आभार दिलीप मेश्राम यांनी मानले . यावेळी शिवा कोडापे, विकेश शिरलावार, कवेश बामनकर, सुरेश बामनकर, स्वाती शिरलावार, आरती बामनकर,राजेश्वरी शिरलावार तसेच पालक उपस्थित होते.