तालुक्यातील माजरी येथे मध्य रेल्वे रुळाच्या कडेला आढळला अद्यनात युवकाचे मृतदेह… — रेल्वेतून पडून मृत्यूची भीती… — पोलीस ओळख पटवण्यात गुंतले…

 

 

उमेश कांबळे ता प्र भद्रावती-

 

दी 27 ला तालुक्यातील माजरी येथे दिल्ली चैनई मुख्य मार्गावरील रेल्वे सिल्गन अप लाईनवरील पोल क्रमांक 841B-27 जवळ एका ३६ वर्षीय अनोळखी युवकाचे मृतदेह रेल्वे रुळांच्या कडेला पडलेला आढळून आला. याची माहिती मिळताच माजरी पोलीस निरीक्षक अजितसिंग देवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस सहाय्यक गजानन तुपकर आणि अविनाश राठोड घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, मात्र ओळख पटू शकली नाही.

मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. पुढील तपास ठाणेदार अजितसिंग देवरे यांच्या नेतृत्वाखाली गजानन तुपकर करत आहे