Home Maharashtra “जल जीवन मिशनच्या कामात,गावकऱ्यांकडून होणारा भ्रष्टाचाराचा आरोप गंभीर तथा चिंताजनक… —...

“जल जीवन मिशनच्या कामात,गावकऱ्यांकडून होणारा भ्रष्टाचाराचा आरोप गंभीर तथा चिंताजनक… — निकृष्ट दर्जाच्या कामांची गावकरीच करु लागले पोलखोल… — भ्रष्ट्राचाराचा प्रथम पाया?

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

          चिमूर तालुक्यात मुख्य कंत्राटदारांच्या नावाने कामाचा कंत्राट करारनामा करुन उपकंत्राटदारांना कामे दिली जात आहेत.उपकंत्राटदारांना कामे देणे हाच भ्रष्ट्राचाराचा पहिला पाया असल्याचे दिसून येते आहे.

       कुठलाही मुख्य बांधकाम कंत्राटदार,(व्यावसायिक) हा विना लाभाने दुसऱ्या व्यक्तीला उपकंत्राटदार म्हणून कामे देतो,यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.

         तद्वतच जल जिवन मिशन योजना अंतर्गत मुख्य कंत्राटदार कामे करण्यासाठी असमर्थ ठरत असतील,”तर,त्यांना कामांचा कंत्राट देणे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता चंद्रपूर व पाणीपुरवठा प्राधिकरण अधिक्षक अभियंता चंद्रपूर यांनी बंद केले पाहिजे या मताची जनता आहे.

          चिमूर तालुक्यात,”जल जिवन मिशन योजना अंतर्गत नळयोजनासह पाणीटाकीचे बांधकामे उपठेकेदारांनी केली आहेत.

           ज्या उपठेकेदारांना जल जिवन मिशन योजना अंतर्गत बांधकामांचा अनुभव नाही,”ज्यांच्याकडे सिव्हिल अभियंता डिग्री नाही,किंवा सदर कामांचा डिप्लोमा नाही,अशांना बांधकामांचे ठेके सर्रास दिल्या जात आहेत.

           जल जिवन मिशन योजना अंतर्गत मंजूर कामांची अंदाजपत्रकीय आराखडा प्रत पाहणे व कामगारांच्या हातून कामे करुन घेणे अशी कार्यपद्धत उपकंत्राटदार यांनी अवलंबिली आहे.

             याचबरोबर मुख्य उपकंत्राटदार,कंत्राटदार हे सुद्धा जल जिवन मिशन योजना अंतर्गत बांधकामांना योग्य दर्जा देण्यास कमी पडत असल्याने नळयोजनांच्या कामांची एकावर्षातच ऐशीतैशी होत असल्याचा अनुभव ग्रामीण भागातील नागरिकांना आलेला आहे..

            जल जिवन मिशन योजना अंतर्गत,”ग्रामीण भागातील नागरिकांना,नियमित स्वच्छ पाणी पुरवठा करण्यास जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय अभियंता,कार्यकारी अभियंता,अधिक्षक अभियंता हे असमर्थ ठरत असल्याने ते कार्यक्षम व कर्तव्यदक्ष आहेत असे मानण्यास ग्रामीण जनता तयार नाही.

            चिमूर तालुक्यातील मौजा महादवाडी,मौजा शंकरपूर,मौजा कपर्ला,व इतर गावात,”जल जिवन मिशन योजना अंतर्गत निकृष्ट दर्जाच्या कामाची बोंबाबोंब सुरु असतानाच,”दोन वर्षात केलेली नळ योजनांची कामे सुध्दा निकृष्ट दर्जाची झाली असल्याची ओरड ग्रामीण भागात सुरु आहे..

       ग्रामीण भागातील अनेक नळयोजना सध्यास्थितीत ठप्प पडल्या असून,याला जबाबदार कोण?हा मुद्दा ऐरणीवर आला आहे…

             राज्य सरकार जल जिवन मिशन योजना अंतर्गत करोडो रुपयांचा निधी ग्रामीण भागातील कामांना उपलब्ध करून देत असेल तर त्या निधीचा सद्उपयोग उत्तम दर्जाच्या कामात असावा व नियमित पाणी पुरवठ्यात असावा असे ग्रामीण भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.

       चिमूर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या व मागील ५ वर्षात झालेल्या नळयोजनांच्या सर्व कामांची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे हे म्हणणे ग्रामीण भागातील नागरिकांचे आहे.

          संबंधित जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयीन यंत्रेणेद्वारा व कंत्राटदार द्वारा,”निकृष्ट दर्जाच्या किंवा अयोग्य कामांना अनुसरून ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पाण्यापासून वंचित केले जात असेल तर जल जिवन मिशन योजनेचा आणि जबाबदार अभियंत्यांचा काय उपयोग? हा प्रश्न अतिशय गंभीरच!