बसपा,कांग्रेस,भाजपा,बिआरएस मध्ये जबरदस्त चौरंगी लढत.. — बसपाला जाणिवपूर्वक डावलले जाते.. — तेलंगणात आज प्रचार तोफा थंडावणार..

     न्यूज नेटवर्क 

दखल न्यूज भारत विशेष..

       तेलंगणा राज्यात ३० नोव्हेंबरला ११९ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.यामुळे तेथील प्रचार तोफा आज सायंकाळी ५ वाजता थांबणार आहेत.

           निवडणूक आयोगाने तेलंगणा राज्याची अंतिम मतदार यादी सार्वजनिक केली असून, तेलंगणा राज्यात एकूण ३ कोटी १७ लाख १७ हजार ३८९ मतदार आहेत.यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ कोटी ५८ लाख ७१ हजार ४९३ आहे तर महिला मतदारांची संख्या १ कोटी ५८ लाख ४३ हजार ३३९ आहे.याशिवाय २,७८० विदेशी मतदार आहेत तर १५ हजार ३३८ सेवा मतदार आहेत.तद्वतच एकूण मतदारांपैकी २,५५७ ट्रान्सजेंडर मतदार आहेत.

            बहुजन समाज विरोधक तथा बहुजन शोषक असलेली जातीयवादी मानसिकतेची इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया,”बहुजन समाज पार्टीच्या ताकदीची सत्यावर आधारित चर्चा करताना दिसत नाही.एवढेच काय तर बहुजन समाज पार्टी देशात तिसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय पार्टी असताना कधीकाळी क्षेत्रीय पार्टी म्हणून बहुजन समाज पार्टीचा नामोल्लेख मनुवादी विचारसरणीचे मिडिया वाले जाणिवपूर्वक करताना दिसतात.एवढेच काय तर बसपाला इतर ठिकाणी दाखवतात..

            मनुवादी विचारसरणीचे लोक बसपाला देशात प्रथम क्रमांकाचा शक्तीशाली पक्ष न होण्यासाठी विविध प्रकारचे,विविध षडयंत्र करून रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात.

           मनुवादी विचार सरणीच्या राजकीय पक्षांना व इलेक्ट्रॉनिक मिडियांसह प्रिंट मीडियांना माहिती आहे इतर पक्षांचे प्रमुख मनुवादी विचारसरणीला सहकार्य करु शकतात,त्यातंर्गत भुमीका घेवू शकतात.परंतू बसपा सुप्रिमो बहन मायावती ह्या मनुवादी विचारसरणीच्या दावणीत बसू शकत नाही किंवा मनुवादी विचारसरणीला अनुसरून तडजोड करु शकत नाही.

         बसपा प्रमुख बहन मायावती ह्या देशातील सर्व नागरिकांचे,”समानतेच्या आधारावर राजकीय,प्रशासकीय,शैक्षणिक,आर्थीक व सामाजिक,बदल (परिवर्तन) घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.या प्रकरचा परिवर्तनीय बदल मनुवादी विचारसरणीच्या इलेक्ट्रॉनिक मिडिया सह प्रिंट मीडियांना,देशातील भांडवलदारांना व मनुवादी विचारसरणीच्या पक्षांना नको आहे.म्हणूनच तिसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय पार्टी असताना,” बसपाचा,कुटनिती अंतर्गत मनुवादी इलेक्ट्रॉनिक मिडियासह प्रिंट मीडिया निवडणूक काळात नामोल्लेख करणे सुध्दा टाळतात..

           मात्र,तेलंगणा राज्यात बसपाने आपल्या राजकीय शक्तीचा दमखम दाखविला असून मनुवादी विचारसरणीचे पक्ष एक होत बसपाला रोखण्यासाठी गोपनीय तडजोड करीत असल्याचे,”बसपाचे तेलंगणा राज्य प्रभारी खासदार शिध्दार्थ गौतम यांचे म्हणणे आहे.

             तरीही तेलंगणा राज्यात सत्तापक्ष बिआरएस,बसपा,कांग्रेस,भाजपा,या पक्षात चुरशीची लढत होणार आहे‌.बसपा,काँग्रेस,बिआरएस,भाजपा तेलंगणा राज्यात सत्तेवर येण्यासाठी आपापल्या परीने सर्व शक्ती पणाला लावत आहेत.

            संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या,”बिआरएस, ला तेथील बहुसंख्य नागरिकांचा कडाडून विरोध असल्याने काँग्रेस व बसपा तेलंगणा राज्य सत्तेच्या जवळ पोहोचल्यास आश्चर्य नसावे.