पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधि देसाईगंज/वडसा...
दखल न्यूज भारत…
शार्ट सर्कीटमुळे विद्युत मिटर जळाल्याने लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी विद्युत विभागाने स्मार्ट मीटर लावल्याने मो.आरीफ पटेल यांचे विद्युत मिटर वरील रिडींग दोन-तीन दिवसांतच २२०० युनिट दाखवित होती.
जुन महिन्यात ०० रूपयाचे बिल आले होते व जुलै महिन्यात तब्बल २६ हजार रूपयाचे बिल आल्याने याबाबत वारंवार विद्युत विभागाशी पत्रव्यवहार करून सुद्धा यावर काही तोडगा त्यांच्याकडून काढण्यात आला नाही किंवा मो.आरिफ पटेल यांचे समाधान करण्यात आले नाही.
मो.आरीफ पटेल यांचे विद्युत मिटरची रिडींगच तितकी जळालेली नसल्याने मी २६ हजार रूपयाचे बिल कसे काय भरणार? असा त्यांचा प्रश्न आहे.
याचबरोबर त्यांची परवानगी न घेताच त्यांच्या घरी स्मार्ट मिटर लावण्यात आले,ही विद्युत कार्यालयाची कुठली कार्यपद्धत आहे हेच त्यांना अजून पर्यंत कळले नाही.
सोलर वरील रिडींग ईम्पोर्ट-एक्सपोर्ट चा विषय आहे, विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांची मोन्टो कंपनीच्या कंत्राटदाराशी संगनमत व विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारला घेऊन मो. आरिफ पटेल हे दि. ६ ऑक्टोंबर २०२५ पासून वडसा येथील विज वितरण कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती त्यांनी दि. २८ सप्टेंबर २०२५ ला पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,मो.आरिफ पटेल यांनी आपल्या घरी ६ के.डब्ल्यु,चे सोलर पॅनल लावले आहे.मात्र अचानक मे २०२५ मध्ये त्यांच्या मिटरवर शार्ट सर्कीट झाल्याने जुने मिटर जळाले.याबाबतची सुचना त्यांनी विद्युत विभागाला दिली.
मात्र त्यांची कोणतीच परवानगी न घेता त्यांच्या घरी विद्युत विभागाने स्मार्ट मिटर लावले.ज्यामुळे त्यांचे दोन ते तीन दिवसांत २२०० युनिट रिडींग दाखवित होती.
जुन महिन्यात ०० चे बिल व जुलै महिन्यात तब्बल २६ हजार रूपयाचे बिल विद्युत विभागाकडून देण्यात आले.याबाबत त्यांनी विद्युत विभागाशी पत्रव्यवहार केला.
परंतु यात त्यांचे पाहिजे तसे कायदेशीर व वास्तव समाधान झाले नाही.घरावर ६ के. डब्ल्यु, चे सोलर पॅनल असल्याने सोलरची रिडींग जनरेशनला कमी दाखवून मनमानी बिल दिल्या जात आहे.
शहरातील असे जवळपास ३५ ते ४० ग्राहक असे आहेत की ज्यांच्या सोलर पॅनलची रिडींग ईम्पोर्ट एक्सपोर्ट झाल्यानंतरही बिलात ०० दाखविण्यात येत आहे.
ज्यामुळे सोलर लावणाऱ्यांचे मोठा आर्थिक नुकसान होत आहे.विशेष म्हणजे विद्युत विभागाने पटेल यांची विद्युत बिलात त्यांची सेक्योरेटी डिपोजिट रक्कम ८५४० रूपये सुद्धा बिलातून गहाळ केली आहे.
ग्राहकांची पुर्व परवानगी न घेता स्मार्ट मिटर लावणे हा गोरखधंदा राज्यात सध्या सुरु आहे.ग्राहकांकडून आधिच स्मार्ट मिटरचा विरोध होत असतांना पटेल यांच्या अनुपस्थिती त्यांच्या घरी स्मार्ट मिटर लावले जाणे हे कोणत्या नियमात बसते हेच कळायला मार्ग नाही.
शॉर्ट सर्कीटनंतर तब्बल २६ हजाराचे बिल व बिलातंर्गत डिपोजिट रक्कम गहाळ करणे,विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांची मोन्टो कंपनीच्या कंत्राटदाराशी संगनमत अश्या विविध विषयाला घेऊन मो. आरिफ पटेल हे येत्या ६ ऑक्टोंबर पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत त्यांनी दिली.
प्रतिक्रिया…..
मागील वर्षीच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट यांच्या ताळमेलच्या फरकानुसार माहे मे,जुन व जुलै या तिन महिन्याचे युनिट नुसारच बिलींग करण्यात आलेली असून याबाबत श्री.पटेल यांना लेखी पत्राद्वारे कळविले होते.



