Home Maharashtra सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेला उत्स्पुर्त प्रतिसाद… — अ...

सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेला उत्स्पुर्त प्रतिसाद… — अ गटातून 636 तर ब गटातून 412,विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा…

      सुधाकर दुधे 

तालुका प्रतिनिधी सावली..

सावली :- विधिमंडळ काँग्रेस गटनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य,आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा,त्यांच्या ज्ञानात भर पडावी व स्पर्धा परीक्षांना समोरे जाऊन उत्तम अधिकारी घडावेत या उद्देशातून सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली.

        शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो कोणी ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. 

       या वाक्यातून,शिक्षणामुळे मिळणारी शक्ती,सामर्थ्य आणि आत्मविश्वासाचे महत्त्व सांगितले आहे.हे शिक्षण एखाद्या वाघाच्या पिलाला ताकद आणि गर्जना करण्याची शक्ती देते,त्याचप्रमाणे शिक्षणामुळे व्यक्तीला समाजात आत्मविश्वासाने आणि धैर्याने वावरण्याची ताकद मिळते,असे ते सूचित करतात.

       आज सामान्य ज्ञान स्पर्धेच्या माध्यमातून उद्द्याचा उत्तम अधिकारी घडविण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न होता,हा उपक्रम राबवून सावली तालुका काँग्रेस कमिटीने विद्यार्थी बांधवांचे मनोबल जिंकले व या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       सामान्य ज्ञान स्पर्धेकरिता गडचिरोली जिल्ह्यातील अति दुर्गम सिरोंचा,भामरागड या तालुक्यातील,तसेच आरमोरी धानोरा व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील विद्यार्थी या स्पर्धेकरिता उपस्थित होते.

        सामान्य ज्ञान स्पर्धे करिता वर्ग ५-१० अ गट तर ११ वी ते खुला वर्ग अशे दोन गट करण्यात आले होते.त्यात अ गटातून ६३६ तर ब गटातून ४१२ एकूण १०४६ विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञानची परीक्षा दिली,ही स्पर्धा विश्वशांती विद्यालय सावली येथे आयोजित करण्यात आली होती.

        यावेळी मुख्याध्यापक श्री.रवींद्र मुप्पावार व त्यांचा सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले तर सावली तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले.

        याप्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्ष उषा भोयर,शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,नगराध्यक्ष साधना वाढई,माजी नगराध्यक्ष लता लाकडे,माजी सभापती प.स.विजय कोरेवार,माजी सभापती प.स.कृष्णा राऊत,युवा तालुका अध्यक्ष किशोर कारडे,जेष्ठ पदाधिकारी प्रशांत राईंचवार,मोहन गाडेवार,प्रवीण सुरमवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार,संचालक सुनील बोमणवार,संचालक केशव भरडकर,संचालक अरविंद भैसारे,महिला शहर अध्यक्ष भारती चौधरी,युवा शहर अध्यक्ष अमरदीप कोणपत्तीवार,माजी उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले,नगरसेवक प्रीतम गेडाम,प्रफुल वाळके,सचिन संगीडवार,नितेश रस्से,अंतबोध बोरकर,गुणवंत,नगरसेविका ज्योती शिंदे,अंजली देवगडे,प्रियंका रामटेके,सीमा संतोषवार,दिपक जवादे,खुशाल राऊत,दिलीप लटारे,दीपक गद्देवार, सुनील पाल,किशोर घोटेकार,श्रीकांत बहिरवार,पंकज सूरमवार तसेंच पदाधिकारी व कार्यकर्तागणं मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले.