राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी..
आरमोरी – आज रोज रविवारला व्हाइस ऑफ मीडियाची रेस्ट हाऊस मध्ये बैठक पार पडली.या बैठकीत आरमोरी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली.
ऋषी सहारे यांची तालुका अध्यक्ष म्हणून तर राजेंद्र मोटघरे यांना सचिव पदी नियुक्त करण्यात आले.
अगोदर तालुका अध्यक्ष सुनील नंदनवार यांची जिल्हा कार्यकारिणीत वर्णी लागल्याने रिक्त असलेल्या आरमोरी तालुका अध्यक्ष पदासाठी आज आरमोरी येथील pwd रेस्ट हाऊसला जिल्हा अध्यक्ष व्यंकटेश डूडमवार यांचे निर्देशानुसार नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली.
यावेळी बैठकीचे अध्यक्ष मुकुंद जोशी सर हे होते.तसेच जिल्हा अध्यक्ष यांचे देखरेखीत बैठक पार पडली.
यावेळी खालील प्रमाणे आरमोरी तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.
पदाधिकारी खालीलप्रमाणे…
अध्यक्ष – ऋषी सहारे,कार्याध्यक्ष – दौलत धोटे,उपाध्यक्ष – सुरेंद्र बावनकर,सचिव – राजेंद्र मोटघरे,कोषाध्यक्ष – देवानंद जांभूळकर,संघटक – सुरेश कांबळे,प्रसिद्धीप्रमुख – रुमदेव सहारे,सल्लागार – भिमराव ढवळे तर सदस्यांमध्ये जिल्हा कार्यकारिणी सदस्य – सुनील नंदनवार…
सर्वानुमते कार्यकारिणीला संमत करण्यात येऊन पुढील नियोजनात अनेक विषय घेण्यात आले.
महत्वाचे म्हणजे आगामी होणारे पंढरपूर येथील राज्य अधिवेशन तसेच पत्रकारांचे ओळखपत्र व आरोग्य मेळावा घेण्यात यावे यावर चर्चा करण्यात आली.



