सिहोरा कन्हानच्या रोशनी गौशाळातुन एसपीस्कॉडने कत्तलखान्यात नेणारे जनावरे ताब्यात.. — २५ लाखाचा मुदेमाल जप्त. — ८ आरोपींना केली अटक.

 

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

 

      पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सिहोरा शिवारातंर्गत अवैध पशु तस्करीच्या धंधात वाढ होत असल्याची माहीती पोलीस अधिक्षक हर्ष पोदार याना झाल्याने,त्यानी गोवंश कत्तलीकरिता तस्करी करणाऱ्या आरोपींवर विशेष पथकाच्या माध्यमातून करडी नजर ठेवली होती.

            विशेष पोलीस पथकाने सिहोर कन्हानच्या रोशनी गौशाळातून एसपीस्काडने कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्यांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.

             मिळालेल्या माहीती नुसार कन्हान नगर परिषदच्या हद्दीतील पोलिस स्टेशनच्या दोन किलोमिटर अंतरावर अनेक वर्षापासुन रोशनी गौशाला येथे पशु तस्करीचालू असल्याचे लक्षात येताच पोलीस पथकाचे प्रमुख यामध्ये सपोनी अमित पांडेय,पोलीस उपनिरीक्षक देविदास ठमके,महेश बिसने,विशाल शंभरकर,अनिल करडके,निलेश विजययाड,निखिल मिश्रा यांनी रोशनी गौशाला येथे धाड मारून ६८ पशु आणी ३ मृत जणावरेसह एकूण ७१ पशुसह एक आईसर ट्रकने एम.ए. 40 सी.9270 मध्ये गोवंश कत्तलीकरिता तस्करी करणाऱ्या आठ आरोपींना नागपूर पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथकाने पकडून त्यांच्यावर कारवाई केली.

          सपोनी अमित पांडेय,पोलीस उपनिरीक्षक देविदास ठमके,महेश बिसने,विशाल शंभरकर,अनिल करडके,निलेश विजययाड,निखिल मिश्रा यांनी विशेष परिश्रम करून सदरची कारवाई केली.

        नागपूर ग्रामीण कन्हान पोस्टेच्या हद्दीमध्ये अवैद्य धंद्यावर रेडकामी फिरत असताना मौजा सिहोरा शिवारात फिरत होते.त्यांनी आईसर ट्रकची झडती घेताच,पाहिले की गाडीच्या आत मध्ये 30 गोवंश जातीचे जनावरे अत्यंत निर्दयतेने व क्लेशदायक पद्धतीने पायांना व मानेला आसुडाल दोरीने बांधून एकमेकांवर गोवंश जनावरे कोबुन ठेवलेले दिसले.

             मोक्यावर असलेले आरोपी

1) भूषण ओंम प्रकाश तरारे वय ३० वर्ष आझाद नगर,

2) मोहम्मद सलिम मोहम्मद कुरेशी वय 31 वर्ष..

3) मोहम्मद वसीम मोहम्मद सलीम कुरेशी वय 33 वर्ष…

4) मोहम्मद रजा अब्दुल जब्बार कुरेशी वय 35 वर्ष..

5) अल्ताफ अश्फाक अहमद कुरेशी वय 19 वर्ष…

6) नदीम सुलतान शेख वय तीस वर्ष सर्व राहणार भाजीमंडी कामठी,तालुका कामठी,जिल्हा नागपूर..

7) रोशनी गोशालाचे विनोद कुमार यादव वय 34 वर्ष राहणार गौलीपुरा कन्हान यांना विशेष पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे.

          आयसर वाहन क्रमांक एम एच.४०,सि.डी.९२७० चालक भूषण तरारे हा आईसर गाडीचा चालक असून गाडी मालक जाफर काल्या राहणार कामगार नगर नागपूर यांचे सांगण्यावरून गोवंश जनावरे कत्तली करिता घेऊन जात असल्याचे सांगितले तसेच सिहोरा कन्हान येथून रोशनी गोशाळेचा मालक विनोद यादव हा गोशाळेचा दुरुपयोग करून गोवंश कत्तलीकरिता विकत असताना आढळून आला.

              एकूण 25 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर एकूण 68 गोवंश जनावरे यात ३६ बैल,२४ गाई,८ कालवड,असे ६८ गोवंश पशु पुढील देखरेखे करिता गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे दाखल करण्यात आले.

           त्यादरम्यान तीन गोवंश जनावरे मृत मिडून आले.सदर सर्व आठ आरोपी विरुद्ध पोस्टे कन्हान येथे अप.क्र. 634/23 कलम 429, 34,109 भादवी सहकलम 11 (1),A, D, E, F, i,प्राण्यास छळ प्रतिबंध अधिनियम 1960 व महाराष्ट्र पशु स्वरक्षण अधिनियम 1976 5 A, B अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

              ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यानी विशेष पोलीस पथक तयार केल्याने अवैध धंदे चालवीणाऱ्यांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे. 

         ६८ गोवंश तस्करी संबंधाने पुढील तपास पों.स्टेशन कन्हानचे पो.नि.सार्थक नेहाते करित आहे .