माटरगाव येथे मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत कलश यात्रा कार्यक्रम उत्साहात साजरा.

 

 

युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक

          संपूर्ण राज्यभर सुरु असलेल्या मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण गावा गावात अमृत कलश यात्रा कार्यक्रम सुरु असून त्याच निमित्याने खल्लार नजिकच्या माटरगाव येथे हा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.

         भजनाच्या गजरात संपूर्ण गावातून अमृत कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे गावात ठिकठिकाणी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले.

         अमृत कलश यात्रेत गावच्या महिला सरपंच तरन्नम अन्सार खान पठाण, ग्रा पं सचिव सुजाता राहुल इंगळे, ग्रा पं सदस्य सौ वंदना वर्धे, सौ संगिता भोंगळे, सौ रुपाली तायडे, सौ संध्या वर्धे, जि प शाळेतील शिक्षक एच पी खापरे, एस एन सोळंके, गटप्रवर्तिका सौ प्रांजली तायडे, अंगणवाडी सेविका, मदतनीस व गावातील सर्व नागरिकांचा सहभाग होता.