शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर : महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपती बाप्पांच्या उत्सवाची तयारी सगळीकडे जोरात सुरू आहे.दहा दिवस चालणारा हा उत्सव सामाजिक बांधिलकी जोपासतो. तालुक्यातील गावांमध्ये एक गाव एक गणपती हा आदर्शही निर्माण झाला आहे.
या उत्सवात धार्मिक,सामाजिक एकतेचे दर्शन होते.ही परंपरा चिमूर तालुक्यात पाहायला मिळते.महाराष्ट्रातील गणेश उत्सव म्हणजे सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी केले.

चिमूर पोलिस स्टेशन येथे मंगळवारी २६ ऑगस्टला शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या बैठकीला ठाणेदार दिनेश लबडे,सुधीर पोहणकर,पोलिस पाटील,शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे अध्यक्ष,सदस्य उपस्थित होते.
यावेळी ठाणेदार लबडे यांनी येणारे सण उत्सव सामाजिक सलोखा सांभाळीत साजरे करा. प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन कायद्याचे पालन करा,इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा.समाजोपयोगी देखावे तयार करून या उत्सवातून सामाजिक संदेश द्या.शासनाने उत्तम देखावे,भजन मंडळ यासाठी पुरस्कारही असतात.या स्पर्धामध्ये भाग घेऊन मंडळासह गावाचे नाव मोठे करा.वर्गणीकरिता धर्मदाय आयुक्तांची परवानगी घ्यावी.मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करा.पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करून समाजासह समा पर्यावरणाचे ऋण फेडण्याचे आवाहन केले.
बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार माजी मुख्याध्यापक सुधीर पोहणकर यांनी मानले.



