Home Maharashtra “आषाढी वारीत समाजप्रबोधनासाठी ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार’ – दिंड्यांचे होणार मुख्यमंत्री...

“आषाढी वारीत समाजप्रबोधनासाठी ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार’ – दिंड्यांचे होणार मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते गौरव!”

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पंढरपूर – सामाजिक जाणीवेचा गजर करीत, पर्यावरण, व्यसनमुक्ती, वृक्षसंवर्धन यांसारख्या विषयांवर प्रबोधन करणाऱ्या तीन उत्कृष्ट दिंड्यांना यंदाच्या आषाढी वारीत ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार आहे. ही माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

      वारकऱ्यांची पंढरीची पायी वारी ही एक प्राचीन, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. यामधून सामाजिक जागृतीही साधली पाहिजे, या हेतूनं २०१८ पासून सुरू झालेल्या या पुरस्काराचे यंदा आठवे वर्ष आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सन्मानाचा स्वरूप खालीलप्रमाणे आहे..

प्रथम क्रमांकाची दिंडी – ₹ १ लाख रुपये व सन्मानचिन्ह

द्वितीय – ₹ ७५ हजार रुपये

तृतीय – ₹ ५० हजार रुपये

      निर्णायक मंडळात ॲड.माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ आणि वृक्षमित्र ह.भ.प. शिवाजीराव मोरे यांचा समावेश आहे.

      ह.भ.प. औसेकर म्हणाले, “आज अनेक दिंड्या सामाजिक भान राखत सुंदर कार्य करत आहेत. त्यांना प्रेरणा मिळावी आणि इतरांनीही या ‘निर्मल वारी, हरित वारी’ उपक्रमात सामील व्हावे, हा या पुरस्काराचा हेतू आहे.”