दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी पुष्पाताई कुऱ्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ.दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते आळंदी येथे समारंभपूर्वक नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँगेस अध्यक्ष खा.शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खा.सुप्रिया सुळे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी, पक्ष बळकटीकरण, पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी पुष्पाताई कुऱ्हाडे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे यावेळी तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी सांगितले.
यावेळी बबनराव कुऱ्हाडे, डी.डि.भोसले पा., विलास घुंडरे, प्रकाश कुऱ्हाडे, प्रदिप बवले, श्रीधर कुऱ्हाडे, रोहन कुऱ्हाडे, अनिकेत कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे, निसार सय्यद, अमोल काळे, आनंद रणदिवे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुष्पा कुऱ्हाडे पाटील यांनी निवडीनंतर, पक्षाने दाखवलेला विश्वास सर्वांना सोबत घेऊन जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मजबुत पक्ष बळकटीकरण बांधणी आणि करून सार्थ करून दाखवु असा विश्वास करत पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल तसेच या कामी सर्वानी केलेली शिफारस दाखवलेला विश्वास याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल.